शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सिमेंट मिक्सर मशीनच्या धडकेत मुलाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:39 IST

वानाडाेंगरी : वेगात असलेल्या सिमेंट मिक्सर मशीनची दुचाकीला एका बाजूला धडक बसली, त्यामुळे दुचाकीवर मागे बसलेला मुलगा त्या मशीनच्या ...

वानाडाेंगरी : वेगात असलेल्या सिमेंट मिक्सर मशीनची दुचाकीला एका बाजूला धडक बसली, त्यामुळे दुचाकीवर मागे बसलेला मुलगा त्या मशीनच्या चाकाखाली सापडल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

त्याचा माेठा भाऊ भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करीत असल्याने ताे माेठ्या भावासाेबत भाजीपाला खरेदी करण्यासाठी जात हाेता. ही घटना हिंगणा शहरातील पाेलीस ठाण्यासमाेर शुक्रवारी (दि. २९) सकाळी ९.१५ वाजताच्या सुमारास घडली.

हितेश सुनील भवसागर (१५, रा. भीमनगर, इसासनी, ता. हिंगणा) असे मृताचे नाव आहे. हितेशचा माेठा भाऊ हिमांशू सुनील भवसागर (२०, रा. भीमनगर, इसासनी, ता. हिंगणा) हा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाला हातभार लावताे. दाेघेही नेहमीप्रमाणे एमएच-४९/एबी-०९०५ क्रमांकाच्या दुचाकीने भाजीपाला खरेदी करण्यासाठी इसासनीहून हिंगणा शहरात जात हाेते. दरम्यान, हिंगणा शहरातील पाेलीस ठाण्यासमाेर टीएन-०१/बीबी-५५८६ क्रमांकाच्या वेगात आलेल्या सिमेंट मिक्सर मशीनने त्यांच्या दुचाकीला एका बाजूला धडक दिली. या सिमेंट मिक्सर मशीनचा दुचाकीला धक्का लागल्याने दुचाकीवर मागे बसलेला हितेश सिमेंट मिक्सर मशीनच्या चाकाखाली आला. त्यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघात हाेताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी हितेशचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हिंगणा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. शिवाय, गुन्हा नाेंदवून सिमेंट मिक्सर मशीन चालकास अटक केली. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक मल्हार डोईफोडे करीत आहेत.