शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

मुख्यमंत्र्यांची तपासावर देखरेख नव्हती

By admin | Updated: June 24, 2015 02:52 IST

मुख्यमंत्री नागपूरचे रहिवासी असल्याने त्यांची तपासावर देखरेख होती, हे खरे नाही, अशी साक्ष तपास अधिकारी निवृत्त पोलीस निरीक्षक ...

युग चांडक हत्याकांड खटला : तपास अधिकारी जयस्वाल यांची उलटतपासणी साक्षनागपूर : मुख्यमंत्री नागपूरचे रहिवासी असल्याने त्यांची तपासावर देखरेख होती, हे खरे नाही, अशी साक्ष तपास अधिकारी निवृत्त पोलीस निरीक्षक सत्यनारायण जयस्वाल यांनी उलटतपासणीत युग चांडक अपहरण-हत्याकांड खटल्याच्या सुनावणीदरम्यान मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे यांच्या न्यायालयात दिली. आरोपी अरविंद सिंग याचे वकील अ‍ॅड. मनमोहन उपाध्याय हे जयस्वाल यांची उलटतपासणी साक्ष घेत होते. जयस्वाल पुढे म्हणाले की, हे खरे आहे की, या गुन्ह्याचा समाजाच्या सर्व स्तरातून निषेध करण्यात आला होता, आंदोलन करण्यात आले होते. या प्रकरणाचा योग्य तपास व्हावा, यासाठी पोलीस आयुक्त काळजी घेत होते. तपासासाठी आपणावर कोणताही बाह्य दबाव नव्हता, हे खरे आहे. हेही खरे आहे की, आरोपींच्या पोलीस कोठडी रिमांडदरम्यान त्यांना सदर आणि अंबाझरी पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवले जात होते. आमच्या लकडगंज पोलीस ठाण्यातही पोलीस कोठडी उपलब्ध होती. कायदा व सुव्यवस्थेची समस्या टाळण्यासाठी आणि आरोपींच्या सुरक्षेसाठी आम्ही त्यांना वेगवेगळे सदर आणि अंबाझरी पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवत होतो. हे खरे आहे की, राजेशचे लाल रंगाचा टी-शर्ट घातलेले आणि अरविंदचे पांढऱ्या रंगाचा शर्ट घातलेले छायाचित्र वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले होते. या गुन्ह्याच्या संबंधाने प्रसिद्ध झालेल्या वृत्तात आपण त्यावेळी पडताळा केला नव्हता. त्यावेळी आपणाला या गुन्ह्याच्या संबंधातील वृत्त असलेले ई-न्यूजपेपरही पाहण्याची संधी मिळाली नव्हती. आरोपी हे ३ सप्टेंबर रोजी सदरच्या पोलीस कोठडीत असताना ते कोणते कपडे घालून होते त्याचे वर्णन मी आज करू शकत नाही. १ सप्टेंबर रोजी पोलीस ठाण्यात असताना सायंकाळी ५.१० वाजताच्या सुमारास युगच्या अपहरणाची तक्रार प्राप्त झाली होती. अपहरणकर्ते निश्चितच खंडणीसाठी डॉ. चांडक यांना फोन करतील, असे आपणास वाटले होते. रात्री ८.१७ वाजता डॉ. चांडक यांनी पोलीस ठाण्यात येऊन खंडणी मागणीच्या फोनबाबत सांगितले होते. आपण या माहितीची स्टेशन डायरीत नोंद घेतली नव्हती. १ सप्टेंबर २०१४ रोजी आरोपी राजेशला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. चौकशीनंतर त्याला घरी जाण्यास सांगण्यात आले होते, हे खरे आहे. दुसऱ्या दिवशी २ सप्टेंबर रोजी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास त्याला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. अरविंदला सायंकाळी ४.३० वाजता पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. त्याला वैशालीनगर येथील शिकवणी वर्गातून आणण्यात आले होते, हे खरे नाही, असेही जयस्वाल यांनी सांगितले. जयस्वाल यांची अर्धवट राहिलेली उलटतपासणी साक्ष उद्या होणार आहे. तत्पूर्वी आरोपी राजेश दवारे याचे वकील अ‍ॅड. प्रदीप अग्रवाल हे आज न्यायालयात उपस्थित नसल्याने त्यांच्या सहकारी अ‍ॅड. राजेश्री वासनिक यांनी जयस्वाल यांची उलटतपासणी साक्ष घेतली. न्यायालयात अतिरिक्त सरकारी वकील ज्योती वजानी, अ‍ॅड. मनोज दुल्लरवार, अ‍ॅड. प्रमोद उपाध्याय उपस्थित होते. (प्रतिनिधी)