नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी माजी खासदार ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये विदर्भाच्या विकासावर चर्चा झाली. विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी जास्तीत जास्त काम करण्याचे आवाहन मेघे यांनी यावेळी केले. त्याला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. सर्वप्रथम मेघे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे शाल, श्रीफळ व गणेश प्रतिमा देऊन सत्कार केला. या वेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. समीर मेघे, सुधाकर देशमुख, अनिल सोले, गिरीश गांधी, सागर मेघे, राजू मिश्रा, महमूद अन्सारी, नारायण आहुजा आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
विदर्भ विकासावर मुख्यमंत्र्यांची मेघेंशी चर्चा
By admin | Updated: January 24, 2016 02:52 IST