शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

मुख्यमंत्री बदलण्याचा प्रश्नच येत नाही- गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 05:53 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बदलविण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांचे काम अतिशय चांगले असल्याचे स्पष्ट करीत केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेला विराम लावला.

ठळक मुद्देभाजपा फडणवीस यांच्यासोबत

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बदलविण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांचे काम अतिशय चांगले असल्याचे स्पष्ट करीत केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेला विराम लावला.शुक्रवारी रात्री गडकरी नागपुरात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर भाजपा मुख्यमंत्री बदलण्याचा विचार करीत आहे का, या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना गडकरी म्हणाले, फडणवीस जनतेची सेवा करीत आहेत. काही लोकांना जातीच्या विषयाला घेऊन समाजात विष कालवण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यांनीच हे पसरवले असेल, संपूर्ण भाजपा मुख्यमंत्र्यासोेबत असल्याचे गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केले.वाहतूकदारांच्या संपासंदर्भात मी आणि अर्थमंत्री पीयूष गोयल लक्ष ठेवून तो मागे घेण्यासंदर्भात प्रयत्न करीत होतो, आज त्याला यश आले. रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाचे सहसचिव अभय दामले यांच्या अध्यक्षतेखाली वाहतूकदारांसोबत शुक्रवारी नवी दिल्लीत बैठक झाली. यावेळी आॅल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे (एआयएमटीसी) अध्यक्ष एस.के. मित्तल आणि पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. यात काही मागण्यांवर संमती दर्शविण्यात आली. हेवी ट्रान्सपोर्ट व्हेईकलकरिता थर्ड पार्टी इन्शुरन्स या मागणीवर आयआरडीएआय चर्चेसाठी तयार झाली आहे. त्याकरिता आयआरडीएआय आणि वाहतूकदारांची बैठक शनिवार, २८ जुलैला होणार आहे. सुलभ टोल कलेक्शनवर केंद्र सरकारने संमती दर्शविली आहे. तंत्रज्ञानाच्या आधारे टोल नाक्यावर सहा महिन्यात आधुनिक यंत्रणा उभारण्यास संमती बैठकीत देण्यात आली. सरकार व्यावसायिक वाहनांचे चालक व सहकाऱ्याला पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना आणि पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेच्या टप्प्यात आणणार आहे. याशिवाय त्यांना ईएसआयसीच्या टप्प्यात आणून आरोग्य सेवा पुरविणार आहे. तसेच टुरिस्ट वाहनांना नॅशनल परमिट स्कीम देणार आहे.वाहतूकदारांच्या अनेक मागण्या केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे. यात वाहनांसाठी फिटनेस सर्टिफिकेट दोन वर्षांसाठी वाढविणे, नॅशनल परमिट नियमात सुलभता आणणे, रस्त्यावर ओव्हरलोडिंगवर कठोर कारवाई, वाहतूक वाहनांची एकसमान उंची, ई-वे बिलाची अंमलबजावणी आदींसह वाहतूकदारांच्या मागण्यांवर बैठकीत चर्चा करण्यात आल्याचे गडकरी यांनी सांगितले.

 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस