शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

मुख्यमंत्र्यांचे गणरायाला साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 01:02 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नागपुरात विविध सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देऊन गणरायाला साकडे घातले. गणेश मंडळांनी विविध सामाजिक उपक्रम राबवावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

ठळक मुद्देविविध मंडळांना दिल्या भेटी : सामाजिक उपक्रम राबविण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नागपुरात विविध सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देऊन गणरायाला साकडे घातले. गणेश मंडळांनी विविध सामाजिक उपक्रम राबवावेत, असे आवाहनही त्यांनी केले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष्मीनगर गणेश मंडळाला भेट दिली. श्री पूजन केले. मंडळातर्फे धातूची मूर्ती स्थापित केली जाते, याचे त्यांनी कौतुक केले. मंडळातर्फे गरीब विद्यार्थ्यांसाठी वह्या-पुस्तके गोळा करून ते वितरित केले जातात. मुख्यमंत्री फडणवीस यांनी वही-पुस्तक गणरायाच्या चरणी अर्पण करून सर्वांना शिक्षण लाभू दे, अशी प्रार्थना केली. मंडळातर्फे राबविण्यात येणाºया सामाजिक उपक्रमांची त्यांनी प्रशंशा केली. यावेळी महापालिकेतील सत्तापक्ष नेते संदीप जोशी उपस्थित होते.यानंतर मुख्यमंत्र्यांनी आरपीएफ बरॅक अजनी येथील रेल्वे सुरक्षा बल गणेशोत्सव मंडळाला भेट देऊन दर्शन घेतले. यासोबतच पांडे ले-आऊट येथील उत्कर्ष सांस्कृतिक मंडळ, भेंडे ले-आऊट येथील श्री सार्वजनिक बाल गणेशोत्सव मंडळ, जयताळा एकात्मतानगर व उज्ज्वल सोसायटी येथील नवयुवक गणेश मंडळ, सरस्वती विहार कॉलनी त्रिमूर्तीनगर येथील सरस्वती विहार गणेशोत्सव मंडळ, प्रतापनगर येथील साहस गणेशोत्सव मंडळ, अभ्यंकरनगर सार्वजनिक बाल गणेश उत्सव मंडळ, कॉर्पोरेशन कॉलनी गणेश उत्सव मंडळ, रामदासपेठ फार्मलॅण्ड गणेश उत्सव मंडळ, इमामवाडा येथील श्री गणेशोत्सव मंडळ, भगवाननगर येथील युवा गणेशोत्सव मंडळ, नरेंद्रनगर येथील महागणपती, मनीषनगर येथील पॅन्थॉननगर आश्रय उत्सव समिती आदी मंडळांना भेट धेऊन गणरायाचे दर्शन घेतले. प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी भाविकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आणि निरोगी व आनंदी जीवनाची मनोकामना केली.मुख्यमंत्री ‘बिफोर टाइम’काही मंडळांना मुख्यमंत्र्यांनी बिफोर टाइम भेट दिली. मुख्यमंत्री येणार म्हणून कार्यकर्त्यांची लगबग सुरू होती. प्रत्येक जण तयारीला लागले होते. अशातच मुख्यमंत्र्यांच्या ताफा येऊन पोहोचला. वेळेपूर्वीच मुख्यमंत्री फडणवीस पोहोचल्याने मंडळांच्या कार्यकर्त्यांना काय करावे, ते सुचेनासे झाले होते.सेल्फीसाठी कार्यकर्त्यांचा आग्रहगणेश मंडळांना भेट दिल्यानंतर मंडळांचे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांसोबत सेल्फी काढून घेण्यास आग्रही दिसले. मुख्यमंत्र्यांनीही बºयाच ठिकाणी कार्यकर्त्यांचे मन राखत सेल्फी काढून घेतला.मुख्यमंत्र्यांवरील विघ्न टळोकाही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस हेलिकॉप्टर अपघातातून बचावले. नागपूरचे पुत्र असलेल्या मुख्यमंत्र्यांवर आता कुठलेही विघ्न येऊ देऊ नको, असे साकडे गणेश मंडळांनी गणरायांना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत घातले.