शहरं
Join us  
Trending Stories
1
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या प्रवाशांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
2
एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात
3
‘आग’वार, २५ ठार... ! टॉवेल निर्मिती कारखान्यात होरपळून आठ जणांचा मृत्यू, तर ‘चारमिनार’लगतच्या इमारतीत १७ जणं गुदमरून ठार 
4
पाकिस्तानी गुप्तहेर नोमान इलाहीचे धक्कादायक खुलासे, टोळीत अनेकांचा समावेश
5
आर्थिक अडचणींमुळे अभिनय क्षेत्र सोडून झाला जादूगार? लोकप्रिय अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल, म्हणाला-
6
मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी, भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेत धोके वाढण्याचा इशारा
7
"१० दिवसांपूर्वी पाकिस्तानला जाऊन आली,आता काश्मीरकडे..."; ज्योतीच्या हालचालींबद्दल आधीच आलेला संशय!
8
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
9
पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका
10
ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक
11
Astro Tips: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी सोमवारी करा २ लवंगांचा सोपा उपाय; विसरून जाल सगळे अपाय!
12
 ‘किती’ जगलो, यापेक्षा ‘कसे’ जगलो हे महत्त्वाचे...
13
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
14
अवकाशातून अत्यंत स्पष्ट फोटो मिळाले असते, पण...; पृथ्वी निरीक्षण उपग्रह प्रक्षेपणाची मोहीम अयशस्वी
15
अबोल वेदना, गोंधळलेली मने : पुरुषांच्या मानसिक आरोग्याची वेळीच दखल घ्या! मानसोपचारतज्ज्ञांचे आवाहन
16
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
17
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
18
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
19
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
20
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव

मुख्यमंत्र्यांनी लावला सीपींना फोन...

By admin | Updated: August 3, 2015 02:43 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महिन्यातून दोन रविवारी तरी नागपुरात येतात. रामगिरीवर सामान्य नागरिकांना थेट भेटण्याची संधी देऊन त्यांचे प्रश्न ऐकून घेतात.

तक्रारीची घेतली दखल : शहरात दहशतीचे वातावरण नकोनागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महिन्यातून दोन रविवारी तरी नागपुरात येतात. रामगिरीवर सामान्य नागरिकांना थेट भेटण्याची संधी देऊन त्यांचे प्रश्न ऐकून घेतात. यामुळेच दरवेळी मुख्यमंत्र्यांसमोर गऱ्हाणी मांडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे नागरिकांनी रामगिरीवर गर्दी केली. अशातच एका महिलेने आपल्याला समाजकंटकाकडून त्रास होत असल्याची तक्रार केली. मुख्यमंत्र्यांनी लगेच त्याची दखल घेतली. तातडीने पोलीस आयुक्तांना फोन लावण्याच्या सूचना दिल्या. संबंधित व्यक्तीचा त्वरित बंदोबस्त करा, असे कडक निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आणि महिलेच्या चेहऱ्यावर सीएम आपलेच असल्याचे समाधान झळकले. रविवारी दिवसभर मुख्यमंत्र्यांनी नागरिकांचे प्रश्न ऐकून घेतले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागरिकांच्या तक्रारी स्वीकारण्याच्या सूचना हैदराबाद हाऊस येथील सचिवालयाला दिल्या आहेत. त्यामुळे नागपूरकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. रविवारी सुमारे ४५० नागरिकांनी मुख्यमंत्र्यांपुढे आपले गऱ्हाणे मांडले. मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे प्रश्न ऐकून घेतले व शक्य तेवढ्या प्रकरणात यंत्रणेला निर्देश देत तातडीने दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांना दिवसभर भेटणाऱ्यांमध्ये अपंग संघटनांचे प्रतिनिधी, संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी अशा अनेकांचा समावेश होता. मुख्यमंत्र्यांनी प्रत्येकाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. काहींचे प्रश्न तत्काळ निघाली निघाले. (प्रतिनिधी)सर्वांना येऊ द्या लोक दुरून येतातमुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी रामगिरीच्या प्रवेशद्वारावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यात बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांचीही मोठी संख्या होती. मात्र, सुरक्षा यंत्रणा सर्वांनाच आत सोडत नव्हती. ही बाब मुख्यमंत्र्यांच्या कानावर गेली. त्यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सर्वांना आत येऊ देण्याचे निर्देश दिले. ‘सर्वांना येऊ द्या, लोक खूप दुरून येतात. त्यांची कामे आपण केलीच पाहिजे. मोठ्या आशेने ते येतात. त्यांना अडवू नका’ असे सांगत मुख्यमंत्र्यांनी सर्वांना आत बोलावून घेतले. या वेळी रामगिरीत प्रवेश मिळालेल्या नागरिकांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान होते.