लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज उत्साहात साजरी करण्यात आली. विविध राजकीय पक्ष, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक,व धार्मिक संघटनांसह विविध संघटनांच्या वतीने महाल येथील छत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यासोबतच शहरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांद्वारे त्यांना अभिवादन करण्यात आले. शासकीय कार्यालयाांध्येही अधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून सामाजिक न्याय विभागाने जागर समतेचा -सामाजिक न्यायाच्या या मोहिमेचा शुभारंभ केला.
विभागीय आयुक्त कार्यालय ()
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात उपायुक्त शैलेश मेश्राम यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. सहसंचालक कमलकिशोर राठी, तहसिलदार अरविंद सेलोकर, नारायण ठाकरे तसेच विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी यावेळी त्यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.
---------
जिल्हाधिकारी कार्यालय ()
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे, अधीक्षक नीलेश काळे, तहसिलदार सुर्यकांत पाटील तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
-------
महावितरण
महावितरणमध्ये शिव जयंती साजरी करण्यात आली. काटोल रॊड येथील कार्यालयात आयोजित कार्यक्रमात महावितरण नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी मुख्य अभियंता दिलीप दोडके, महाव्यस्थापक (वित्त व लेख) शरद दाहेदार, अधीक्षक अभियंता हरीश गजबे, नारायण आमझरे, अविनाश सहारे उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे, सचिन लहाने यावेळी उपस्थित होते.
-------
बहुजन समाज पार्टी ()
बहुजन समाज पार्टी नागपूर जिल्ह्याच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाल येथील शिवाजी महराजांच्या पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रदेश सचिव उत्तम शेवडे, नागपूर जिल्हा प्रभारी नागोराव जयकर, सुरेखा डोंगरे, वर्षा वाघमारे, माजी पक्षनेते गौतम पाटील, महेंद्र रामटेके, माजी नगरसेवक संजय जयस्वाल, महेश सहारे, महिपाल सांगोडे, विलास पाटील आदी उपस्थित होते.
--------