शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती शिवाजी महाराजांनी देशाला दिले आत्मनिर्भरतेचे सूत्र; सरसंघचालक डॉ.मोहन भागवत

By योगेश पांडे | Updated: April 2, 2025 21:35 IST

युगंधर शिवराय पुस्तकाचे प्रकाशन

- योगेश पांडे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम व लढाया माहिती आहे. मात्र त्यामागील नियोजन व व्यवस्थापन जगापर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे. त्यांचे आरमार, किल्ले, लांब पल्ल्याच्या तोफांसाठीचे तंत्रज्ञान यातून त्यांचे प्रशासन कौशल्य दिसून येत होते. विशेष म्हणजे प्रत्येक बाबतीत देश आत्मनिर्भर व्हावा हे सूत्र त्यांनी देशाला दिले. त्यांच्या कल्पना त्यांनी अस्तित्वात आणल्या, मात्र आपण अद्यापही अनेक कल्पना लागू करू शकलेलो नाहीत, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी केले. दिवंगत शिवचरित्र अभ्यासक व शिवव्याख्याते डॉ.सुमंत दत्ता टेकाडे यांच्या युगंधर शिवराय या पुस्तकाचे त्यांच्या हस्ते बुधवारी प्रकाशन झाले. त्यावेळी ते बोलत होते.

मुंडले सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला मुधोजीराजे भोसले, पुस्तकाचे संपादक डॉ.श्याम माधव धोंड, प्रकाशक सचिन उपाध्याय, दत्ता शिर्के, माधवी सुमंत टेकाडे हे प्रामुख्याने उपस्थित होते. सिकंदराच्या काळापासून आपल्या देशावर आक्रमणाचा क्रम सुरू झाला व बाहेरून आलेल्या मुघलांनी इस्मामच्या नावावर सर्व उद्धस्त करण्यावरच भर दिला. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकामुळे देशातील पारतंत्र्याचे युग बदलले. छत्रपती शिवरायांनी केवळ तत्कालिनच नव्हे तर भविष्यातील भारतालादेखील दिशा दिली. त्यांच्या राज्याभिषेकानंतर अनेकांची सद्दीच संपली, असे सरसंघचालक म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांची राष्ट्राबाबतची संकल्पना स्पष्ट होती. त्यांचे विचार नवीन पिढीपर्यंत गेले पाहिजे व त्यासाठी शिवचरित्र किर्तनकार समाजात असणे आवश्यक आहे. किर्तनातून सामाजिक बदल होतात ही भोळी श्रद्धा नाही तर त्यामागे सामाजिक तंत्र आहे याकडेदेखील सरसंघचालकांनी लक्ष वेधले. यावेळी मुधोजीराजे भोसले,डॉ.श्याम धोंड यांनी डॉ.सुमंत टेकाडे यांच्या प्रवासावर भाष्य केले. माणिक ढोले यांनी प्रास्ताविक केले, तर वैशाली उपाध्ये यांनी शिवमहिमा गायन केले. डॉ.सतिश चाफले यांनी संचालन केले तर दत्ता शिर्के यांनी आभार मानले.

संघासाठी हनुमान व छत्रपती शिवरायच मूर्त आदर्शसंघाचे काम तत्वरूप असून व्यक्तीवादाला येथे जागा नाही. जर साकार व मूर्त आदर्श डोळ्यासमोर ठेवायचेच असतील तर संघात दोनच जणांना मानले जाते. त्यात हनुमान व छत्रपती शिवाजी महाराज हे दोघेच आहे, असे सरसंघचालकांनी सांगितले.

शिवरायांचे कमीत कमी दोन गुण तरी बाळगाछत्रपती शिवाजी महाराज हे आजच्या युगाचे आदर्श पुरूषच आहेत. त्यांचे व्यक्तिमत्त्व वाचताना किंवा ऐकताना त्याचे अनुकरण करण्यावर भर असला पाहिजे. आपण त्यांचे सर्व नाही, पण कमीत कमी दोन गुण तरी अंगी बाळगले पाहिजेत, असे आवाहन सरसंघचालकांनी केले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवत