शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भूमाफियांची कुंडली तपासणार

By admin | Updated: May 17, 2017 01:52 IST

कुख्यात भूमाफिया दिलीप ग्वालबन्सी आणि त्याच्या टोळीतील गुंडांभोवती भक्कम कारवाईचा फास

एसआयटीची व्याप्ती ग्वालबन्सी प्रकरणापुरती मर्यादित नाही नरेश डोंगरे । लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कुख्यात भूमाफिया दिलीप ग्वालबन्सी आणि त्याच्या टोळीतील गुंडांभोवती भक्कम कारवाईचा फास आवळण्याच्या निमित्ताने निर्माण करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाची (एसआयटी) व्याप्ती केवळ ग्वालबन्सी प्रकरणापुरतीच मर्यादित नाही. ग्वालबन्सी, त्याचे गुन्हेगार नातेवाईक, ग्वालबन्सी टोळीतील गुंड आणि त्यांच्याप्रमाणेच सर्वसामान्य नागरिकांच्या जमिनी हडपणाऱ्या भूमाफियांचीही कुंडली एसआयटी तयार करीत आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी मंगळवारी लोकमतशी बोलताना दिली. शेकडो गोरगरीब नागरिक आणि सर्वसामान्य नोकरदारांसोबतच चक्क पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचीही जमीन हडपणाऱ्या भूमाफिया दिलीप ग्वालबन्सी, जगदीश ग्वालबन्सी, हरीश ग्वालबन्सी आणि त्याच्या नातेवाईकांसह गुंडांवरही पोलिसांनी कारवाईचा सपाटा लावला आहे. तब्बल तीन दशकांहून अधिक कालावधीपासून गिट्टीखदान, काटोल मार्ग, झिंगाबाई टाकळी, हजारी पहाड, सुरेंद्रगड, कोराडी, गोधनी आणि आजूबाजूच्या परिसरात ग्वालबन्सी टोळीने पैसा आणि दंडुकेशाहीच्या जोरावर अक्षरश: हैदोस घातला आहे. त्यांच्या गुंडगिरीसोबतच राजकीय संरक्षणाची जोड असल्याने पोलिसही त्यांच्यावर कारवाई करीत नव्हते. मात्र, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी आतापर्यंत भल्या भल्या पोलीस अधिकाऱ्यांनी जे केले नाही, ते करण्याचे धाडस दाखविले. केवळ गुन्हेच दाखल केले नाही तर ग्वालबन्सीला गजाआड करून त्याच्या साम्राज्यावर बुलडोझरही चालविला आहे. अनेक पीडितांना त्यांची जमीन परत करण्याचीही धडाकेबाज कारवाई पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वातील शहर पोलीस दलाने केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक नागपूर पोलिसांवर स्तुतिसुमने उधळत आहेत. दुसरीकडे केवळ ग्वालबन्सीच नव्हे तर त्याच्यासारखे अनेक भूमाफिया आणि त्याची पिलावळ उपराजधानीत वळवळत असल्यामुळे या पिलावळीलाही ठेचले जावे, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक करीत आहे. इच्छा असूनही अनेक पीडित नागरिक विविध भागातील भूमाफियांविरुद्ध तक्रार करण्यासाठी पुढे येण्याची हिंमत दाखवत नाही. अशी या भूमाफियांची विविध भागात दहशत आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांशी लोकमतने विशेष बातचीत केली. ती पुढीलप्रमाणे आहे. एसआयटीची निर्मिती केवळ ग्वालबन्सी प्रकरणापुरतीच आहे का? पोलीस आयुक्त : नाही. अशाप्रकारचे जेवढे गुन्हे शहरात झाले आहेत किंवा जे जे पीडित तक्रार करीत आहेत त्या सर्वच प्रकरणाची चौकशी करून पोलीस कडक कारवाई करणार आहेत. सर्वसामान्य नागरिक भूमाफियांच्या दहशतीमुळे तक्रार करण्यास घाबरतात. पोलीस आयुक्त : अजिबात घाबरण्याचे कारण नाही. पीडित नागरिकांनी बिनधास्तपणे एसआयटीकडे तक्रारी कराव्या. प्रत्येक तक्रारीची दखल घेतली जाईल का? पोलीस आयुक्त : हो, प्रत्येक तक्रारीची दखल घेतली जाईल. मात्र, तक्रार करणाऱ्यांनी बनवाबनवी करू नये. पुराव्यानिशी तक्रार करावी. उगाच कुणाला त्रास देण्याच्या हेतूने कुणाची खोटी तक्रार केल्याचे स्पष्ट झाल्यास खोटी तक्रार करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. अनेकदा तक्रार करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांकडे पीडितांना तासन्तास बसावे लागते. त्यामुळे संबंधित तक्रारकर्त्यांनी थेट कुणाला भेटावे, त्यासाठी कुणी अधिकारी उपलब्ध होईल का? पोलीस आयुक्त : होय. नक्कीच उपलब्ध होतील. गुन्हेशाखेचे पोलीस आयुक्त संभाजी कदम किंवा सहायक पोलीस आयुक्त सोमनाथ वाघचौरे यांची थेट भेट घेऊन पीडित व्यक्ती तक्रार करू शकतात. या संबंधाने गुन्हेशाखेच्या (०७१२ : २५६६६०४ किंवा २५६५५७०) संपर्क नंबरवर पीडित व्यक्ती फोन करू शकतात. भूमाफियांची दहशत कमी करण्यासाठी मोक्कासारखी कडक कारवाई करणार का ? पोलीस आयुक्त : भूमाफिया, गुंडांच्या टोळ्या यांची दहशत कमी करण्यासाठी पोलीस शक्य होईल तेवढी कडक आणि कायदेशीर कारवाई करणार आहेत. त्यासाठी नागपुरातील भूमाफिया आणि गुन्हेगारांची कुंडली तयार करण्यात आली आहे.