शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

मुलाच्या हत्येचा सीआयडी तपास करा

By admin | Updated: March 8, 2017 02:41 IST

मुलाच्या हत्येचा सीआयडीमार्फत तपास व्हावा यासाठी पीडित वडीलाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर

वडिलांची हायकोर्टाला विनंती : गृह विभागाच्या सचिवांना नोटीस नागपूर : मुलाच्या हत्येचा सीआयडीमार्फत तपास व्हावा यासाठी पीडित वडीलाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व इंदिरा जैन यांनी मंगळवारी याचिकेवर सुनावणी केल्यानंतर, गृह विभागाचे सचिव व अन्य प्रतिवादींना नोटीस बजावून दोन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. त्र्यंबक डोंगरदिवे असे बापाचे नाव असून ते निंबा, ता. भातकुली, जि. अमरावती येथील रहिवासी आहेत. त्यांच्या मुलाचे नाव प्रफुल्ल होते. प्रफुल्ल इयत्ता १२ वीचा विद्यार्थी व दलित पँथर संघटनेचा तालुकाध्यक्ष होता. तो अवैध दारू विक्रीच्या व्यवसायात गुंतलेला होता. १६ आॅक्टोबर २०१६ रोजी तो मित्र प्रदीप मोहोडसोबत मोटरसायकलने कुरुम गावाकडे जात होता. दरम्यान, पोलीस कॉन्स्टेबलने त्यांना अडवले. त्यामुळे त्यांच्यात शाब्दिक चकमक सुरू झाली. त्यावेळी अवैध दारू विक्री करणाऱ्या अन्य गटातील लोकांनी प्रफुल्ल व प्रदीपवर काठ्या व लोखंडी रॉडने हल्ला केला. प्रदीप पळ काढण्यात यशस्वी ठरला तर, त्या लोकांनी प्रफुल्लला जागेवरच ठार केले. माना पोलिसांच्या हद्दीत ही घटना घडली. प्रदीपने पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता त्याची दखल घेण्यात आली नाही. दुसऱ्या दिवशी प्रफुल्लचा मृतदेह रेल्वे रुळावर कटलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याच्या हत्येला अपघाताचे स्वरूप देण्यात आले, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. प्रदीप वाठोरे यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)