शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

सदनिकेचा ताबा देण्याची बतावणी करून फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 23:53 IST

सदनिकेचे अर्धवट बांधकाम पूर्ण करून ताबा मिळवून देण्याची बतावणी करून फसवणूक करणाऱ्या धनंजय धोंडारकर (रा. अवतार मेहेरबाबा सोसायटी, बोले पेट्रोल पंपाजवळ) नामक व्यक्तीविरुद्ध सीताबर्डी पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केला. धोंडारकर वकील असल्याचे पोलीस सांगतात.

ठळक मुद्देरक्कमही परत केली नाही : सीताबर्डीत वकिलाविरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सदनिकेचे अर्धवट बांधकाम पूर्ण करून ताबा मिळवून देण्याची बतावणी करून फसवणूक करणाऱ्या धनंजय धोंडारकर (रा. अवतार मेहेरबाबा सोसायटी, बोले पेट्रोल पंपाजवळ) नामक व्यक्तीविरुद्ध सीताबर्डी पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केला. धोंडारकर वकील असल्याचे पोलीस सांगतात.लक्ष्मीनगरातील रहिवासी अनिल देवराव मालन यांच्या तक्रारीनुसार, त्यांनी काही वर्षांपूर्वी संचयनीनगरीत एक सदनिका घेतली होती. बिल्डरकडून नमूद मुदतीत बांधकाम व ताबा न मिळाल्याने हे प्रकरण कोर्टात गेले. दरम्यान, मालन यांची धोंडारकरसोबत ओळख झाली. यावेळी धोंडारकर यांनी हे अर्धवट बांधकाम सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली मोरया अ‍ॅग्रो प्लॅन्टेशन पूर्ण करून देणार आहे, असे सांगितले. त्यानंतर सदनिकेचा ताबा मालन यांना देण्याचे आमिष दाखवून १ लाख ८८ हजार ५०० रुपयांचे दोन धनादेश २९ आॅगस्ट २०११ ला मालन यांच्याकडून घेतले. विशेष म्हणजे, मोरया अ‍ॅग्रो प्रा. लि.चे मालक प्रफुल्ल वैद्य आणि त्यांची पत्नी वर्षा यांचा या प्रकरणात काहीएक संबंध नसताना धोंडारकर यांनी स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी एक संयूक्त बँक खाते उघडून त्यात रक्कम जमा केली. त्यानंतर वारंवार पैशाची मागणी करूनही धोंडारकर यांनी मालन यांना रक्कम परत केली नाही. त्यामुळे मालन यांनी सीताबर्डी ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी चौकशी करून धोंडारकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीadvocateवकिल