तिघांवर गुन्हा दाखल : अनेकांना फसविले नागपूर : पीएमटी परीक्षेत चांगले मार्क मिळवून देण्याचे आमिष दाखवून ६ लाख ६८ हजार रुपयांनी फसविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मंगेश पोटे रा. बेलतरोडी, कृष्णराव अकुला रा. हैदराबाद, डीडी टार्गेट डीएमटी प्रा. लि.चे डायरेक्टर प्रकाश येडेकर, सीमा आणि अजय दोघेरी राहणार जनकपुरी दिल्ली अशी आरोपीची नावे आहेत. अविनाश बडगे (४३) रा. गड्डीगोदाम यांनी यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी केलेल्या तक्रारीनपसार आरोपी मंगेश व त्याच्या सहकाऱ्यांनी अविनाश यांच्यासह जेसी वूमेन तोमस, (४३) रा. मोहननगर, विकस बैस (५३) रा. बजाजनगर, कमील अहमद खान (४८) रा. जाफरनगर, अविनाश कामसोगोर (४९), रा. मेडिकल रोड, अखिलेश दीक्षित (५०) नर्मदा कॉलनी, चंद्रभान काळे (५८) रा. महालक्ष्मीनगर, अनिल नगरारे (५२) रा. हजारी पहाड यांचा व त्यांच्या मुलामुलींचा विश्वास संपादित करून त्यांना पीएमटी परीक्षेत चांगले गुण मिळवून देण्याचे आश्वासन देऊन त्यांच्याकडून मार्च २०१४ ते फेब्रुवारी २०१५ दरम्यान एकूण ६ लाख ६८ हजार १२० रुपये घेतले. परंतु त्यांना पीएमटीचे कुठलेही प्रशिक्षण दिले नाही. किंवा अभ्यासक्रमही शिकविला नाही. संपूर्ण रक्कम हडप केली. अंबाझरी पोलिसांनी या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)
पीएमटी परीक्षेच्या नावावर फसवणूक
By admin | Updated: November 14, 2015 03:12 IST