शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

प्रेम एकीशी अन् लग्न दुसरीशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 10:41 IST

प्रेमात लग्नाच्या आणाभाका घेऊन आठ वर्षांपासून शरीरसंबंध जोडणाऱ्या एका तरुणीला (वय ३१) वाऱ्यावर सोडून आता दुसरीसोबत लग्न करण्याच्या तयारीत असलेल्या तरुणाविरुद्ध अजनी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देआठ वर्षांत वारंवार शरीरसंबंधप्रेयसीने लावला बलात्काराचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रेमात लग्नाच्या आणाभाका घेऊन आठ वर्षांपासून शरीरसंबंध जोडणाऱ्या एका तरुणीला (वय ३१) वाऱ्यावर सोडून आता दुसरीसोबत लग्न करण्याच्या तयारीत असलेल्या तरुणाविरुद्ध अजनी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. प्राजक्त प्रमोद धाईत असे आरोपीचे नाव आहे.आरोपी धाईत चामोर्शी रोड, गडचिरोली येथील रहिवासी आहे. सध्या तो नरेंद्रनगर चौकातील एम्प्रेस मिल कॉलनी, श्रीनगरमध्ये राहतो. तो आणि तक्रार करणारी तरुणी एकाच कंपनीत मार्केटिंगचे काम करायचे. त्याचे आणि तरुणीचे आठ वर्षांपूर्वी प्रेमसंबंध जुळले. त्यांनी लग्नाच्या आणाभाका घेतल्या. त्यानंतर आरोपी राहत असलेल्या ठिकाणी जाऊन ते मनात येईल तेव्हा शरीरसंबंध प्रस्थापित करायचे. १६ ऑक्टोबर २०११ पासून त्यांच्यात अनेकदा शरीरसंबंध प्रस्थापित झाले. ८ जूनपर्यंत त्यांचे संबंध सुरळीत होते. अलीकडे लग्नाचा विषय काढताच आरोपी धाईत तिला टाळू लागला. त्यामुळे तिला संशय आला. तिने त्याच्या मित्रांकडे चौकशी केली असता, त्याने दुसऱ्याच एका तरुणीशी लग्न जुळविले. त्याने २० एप्रिलला साखरपुडाही उरकल्याची माहिती तिला मिळाली. त्यामुळे ८ जूनला त्यांच्यात कडाक्याचा वाद झाला. यावेळी त्याने लग्न तुझ्याशीच करणार आहे, असे सांगून वेळ मारून नेली. त्यानंतर लग्न कधी करणार, अशी विचारणा करताच तो विषय बदलवू लागला. तिने त्याच्यामागे तगादा लावल्यामुळे तो तिला टाळू लागला. तिने त्याला स्पष्ट सांग, असे म्हणताच त्याने रविवारी लग्नास स्पष्ट नकार दिला. परिणामी, तरुणीने अजनी ठाण्यात तक्रार नोंदवून त्याच्यावर बलात्काराचा आरोप लावला. पोलिसांनी तिच्या तक्रारीवरून धाईतविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजी