शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टर बनविण्याचे स्वप्न दाखवून फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 00:21 IST

मुलाला डॉक्टर बनविण्याचे स्वप्न दाखवून बंगळुरूमधील आरोपीने नागपुरातील एका पित्याला ४० हजारांचा गंडा घातला. आरोपीचा संशय आल्याने वेळीच तक्रार केल्यामुळे पुढे रक्कम लाटण्याचे प्रयत्न करणाऱ्या आरोपीचा डाव फसला. जुलै ते सप्टेंबर २०१८ दरम्यान घडलेल्या या बनवाबनवी प्रकरणात सदर पोलिसांनी आज सहा महिन्यानंतर गुन्हा दाखल केला. या प्रकरणातील तक्रारकर्ते स्वत: डॉक्टर आहेत, हे विशेष!

ठळक मुद्देरक्कम लाटण्याचे प्रयत्न : सदरमध्ये गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुलाला डॉक्टर बनविण्याचे स्वप्न दाखवून बंगळुरूमधील आरोपीने नागपुरातील एका पित्याला ४० हजारांचा गंडा घातला. आरोपीचा संशय आल्याने वेळीच तक्रार केल्यामुळे पुढे रक्कम लाटण्याचे प्रयत्न करणाऱ्या आरोपीचा डाव फसला. जुलै ते सप्टेंबर २०१८ दरम्यान घडलेल्या या बनवाबनवी प्रकरणात सदर पोलिसांनी आज सहा महिन्यानंतर गुन्हा दाखल केला. या प्रकरणातील तक्रारकर्ते स्वत: डॉक्टर आहेत, हे विशेष!डॉ. संजय नायडे हे सदरमधील मोहननगरात राहतात. त्यांना साहिल नामक मुलगा आहे. त्याला डॉक्टर बनविण्याचे नायडे यांचे प्रयत्न आहे. त्यासाठी ते जून-जुलै २०१८ मध्ये एमबीबीएस अ‍ॅडमिशनची ऑनलाईन माहिती घेत होते. १ जुलैला त्यांना ०७२२३२३४७० वरून फोन आला. स्वत:चे नाव विवेक राज सांगणाऱ्या आरोपीने साहिलची अ‍ॅडमिशन करून देण्याची हमी दिली. त्यासाठी त्याने एक अकाऊंट नंबर देऊन त्यात ४० हजार रुपये जमा करायला सांगितले. आरोपीकडून मिळत असलेली माहिती लक्षात घेता, त्याला एमबीबीएस प्रवेशप्रक्रियेची सविस्तर माहिती असल्याचे लक्षात आल्याने डॉ. नायडे यांनी आरोपीच्या खात्यात ४० हजार रुपये जमा केले. ही रक्कम जमा केल्यानंतर आरोपीने पुन्हा नवनवे कारण सांगून रक्कम जमा करायला सांगितले. ५ सप्टेंबर २०१८ पर्यंत आरोपी वारंवार फोन, मेसेज करीत असल्यामुळे डॉ. नायडे यांना संशय आला. त्यांनी लगेच सायबर शाखेत जाऊन या प्रकरणाची माहिती दिली. आरोपीने ज्या क्रमांकावरून डॉ. नायडेंशी संपर्क केला तो क्रमांक बेंगळुरू आणि त्याने दिलेला बँक खात्याचा क्रमांकही बेंगळुरू येथीलच एसबीआयचा असल्याचे स्पष्ट झाले. सायबर शाखेच्या अधिकाऱ्यांनी लगेच ते खाते फ्रीज करून नायडे यांची रक्कम सुरक्षित केली तर, आरोपीसोबत संपर्क केला असता, त्याने प्रतिसाद देणे बंद केले. त्यामुळे नंतर सायबर शाखेने हे प्रकरण सदर पोलिसांकडे सोपविले. पीएसआय विनोद म्हात्रे यांनी या प्रकरणात गुरुवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.टोळी सक्रिय!मुलांना डॉक्टर बनविण्याचे स्वप्न दाखवून पालकांना लाखोंचा गंडा घालणारी टोळी अनेक वर्षांपासून सक्रिय आहे. लोकमतने या टोळीचा गेल्या वर्षी भंडाफोड केल्यानंतर सीताबर्डीत गुन्हाही दाखल झाला होता. फसगत झालेल्या पालकांनीच या प्रकरणात उदासीन भूमिका स्वीकारल्यामुळे आरोपींचे फावले.

टॅग्स :fraudधोकेबाजीdoctorडॉक्टर