शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

१८ महिन्यात मिळणार स्वस्त घर

By admin | Updated: December 31, 2016 03:01 IST

एकीकडे नागपूर सुधार प्रन्यासला (नासुप्र) बरखास्त करण्यास राज्य सरकारने तत्त्वत: मंजुरी दिली आहे.

नासुप्र करणार पंतप्रधान घरकुल योजनेचे भूमिपूजन :झोपड्यांचे पट्टे वितरण, १० एसटीपीची कामेही सुरू होणार नागपूर : एकीकडे नागपूर सुधार प्रन्यासला (नासुप्र) बरखास्त करण्यास राज्य सरकारने तत्त्वत: मंजुरी दिली आहे. तर दुसरीकडे या निर्णयाने न घाबरता नासुप्रने विकास कामांची घोषणा केली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नासुप्र पंतप्रधान घरकुल योजनेंतर्गत १२६८ फ्लॅटच्या प्रकल्पाचे भूमिपूजन करणार आहे. पंतप्रधान घरकुल योजनेवर काम सुरु करणारी नासुप्र ही देशभरातील पहिली संस्था असेल. यासोबतच जे काम सुरू केले जाईल, ते पूर्ण सुद्धा करण्यात येईल. १८ महिन्यात पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होईल. येत्या तीन वर्षात हा प्रकल्प पूर्ण केला जाईल, असा विश्वास नासुप्रचे सभापती डॉ. दीपक म्हैसेकर यांनी व्यक्त केला आहे. पत्रकारांशी चर्चा करतांना डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले की, १ जानेवारी रोजी घरकुल योजनेसह १० सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी)चे भूमिपूजन, झोपडपट्ट्यांचे पट्टे वितरण आणि झुलेलाल स्पोटर््स सेंटर, बिनाकी येथे स्विमिंग पुलचेही लोकार्पण केले जाणार आहे. ‘कॅशलेस पेमेंट’ योजनेवरील अमलही याच दिवशी केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. म्हैसेकर यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत देशात सर्वांसाठी घर बनवून देण्याचा संकल्प केला आहे. तो संकल्प पूर्ण करण्यासाठी नासुप्रने पाऊल उचलले आहे. राज्यात नासुप्र ही पहिलीच संस्था जी या प्रकल्पावर काम सुरू करीत आहे. १५ महिन्यात १२६८ स्वस्त फ्लॅट निर्माण केले जातील. त्यानंतर काही जमिनींचे आरक्षण बदलल्यानंतर १५,१९६ फ्लॅटची घरकुल योजना तयार केली जाईल. नासुप्र, मनपा, म्हाडा मिळून शहरात ५० हजार घर बनवणार आहे. नासुप्र पहिल्या टप्प्यात वाठोडा येथे ०.८५ हेक्टर जमिनीवर ३०८ ईडब्ल्यूएस वर्गाची फ्लॅट स्कीम तयार करीत आहे. यावर ३६.२४ कोटी रुपये खर्च केले जातील. तसेच मौजा वांजरी येथे २.४५३ हेक्टर जमिनीवर ९६० फ्लॅट आणि १२ कमर्शियल गाळे तयार केले जातील. यावर ९३.५२ कोटी रुपये खर्च होण्याचा अंदाज आहे. यात ३२३ वर्ग फुट क्षेत्रात फ्लॅट राहतील. तळमजल्यासह चार माळे राहतील. ही योजना सौर ऊर्जेवर आधारित तयार केली जाणार आहे. (प्रतिनिधी)