शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पाच्या वाढीव खर्चासोबत कमी होईल शुल्क

By admin | Updated: January 21, 2016 02:42 IST

खासगी सहभागातून राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पासाठी महापालिकेतील नोंदणीकृत प्रकल्प व्यवस्थापन ...

सल्लागारांच्या मनमानीला लगाम : शुल्क निश्चितीचे नवे धोरणनागपूर : खासगी सहभागातून राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पासाठी महापालिकेतील नोंदणीकृत प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार(पीएमसी) यांच्या मनमानीला लगाम घातला जाणार आहे. यासाठी नवीन धोरण तयार करण्यात आले आहे. त्यानुसार प्रकल्पाच्या वाढीव खर्चासोबतच सल्लागाराला देण्यात येणाऱ्या शुल्कात घट होणार आहे. बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत या नवीन धोरणाला मंजुरी देण्यात आली. पीएमसी संदर्भात महापालिकेची कोणत्याही स्वरूपाची नियमावली नव्हती. त्यामुळे त्यांची मनमानी सुरू होती. परंतु आता ४ टक्केपेक्षा अधिक शुल्क दिले जाणार नाही. तसेच सल्लागाराला कामानुसार मोबदला दिला जाणार आहे. प्रकल्पाची देखरेख व जबाबदारी त्यांच्याकडे राहणार आहे. १०० कोटीपेक्षा अधिक खर्चाच्या प्रकल्पावर पीएमसीला १ टक्का शुल्क देण्यात येईल. त्यात निविदा प्रक्रियेपूर्वी ०.१ टक्के तर निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ०.९० टक्के रक्कम देण्यात येईल. तसेच गरज असेल तरच सल्लागाराची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. खासगी सहभागातून प्रस्तावित असलेल्या एका प्रकल्पासाठी सल्लागार नियुक्त करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला होता. यात ३ कोटीपर्यंतच्या प्रकल्पाच्या रकमेत कोणत्याही स्वरूपाचा बदल करण्यात आलेला नाही. निविदा प्रक्रियेनंतर ५० टक्के ऐवजी २२.५० टक्के तर पोस्ट निविदा प्रक्रियेनंतर ६७.५० टक्के शुल्क देण्यात येईल. प्रकल्प सल्लागाराच्या प्रत्येक धनादेशातील ५ टक्के रक्कम कमी करून सुरक्षा ठेव म्हणून जमा केली जाईल. प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर ही रक्कम परत केली जाईल. नवीन धोरणामुळे प्रकल्पांच्या कामाला गती मिळेल, प्रकल्प अर्धवट सोडून जाणाऱ्यांची रक्कम गोठविली जाईल. यामुळे काम न करता पैसै घेण्याला आळा बसेल, असा विश्वास स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)