शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

चौकीदाराचा जामीन फेटाळला

By admin | Updated: June 18, 2017 01:56 IST

बुटीबोरी येथील होलीक्रॉस निवासी शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी विशेष

बुटीबोरी निवासी शाळेतील विद्यार्थ्यांवरील अत्याचार प्रकरण लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : बुटीबोरी येथील होलीक्रॉस निवासी शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ओ. पी. जयस्वाल यांच्या न्यायालयाने आरोपी चौकीदाराचा जामीन अर्ज फेटाळून लावला. होमदेव उत्तम पडोळे (२५) रा. बामणी भंडारा, असे आरोपी चौकीदाराचे नाव आहे. होमदेवच्या अत्याचारास बळी पडलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनीनी बाल कल्याण समितीपुढे दिलेले बयान धक्कादायक होते. हा चपराशी हा दारू पिऊन राहायचा, विद्यार्थ्यांकडून कामे करून घ्यायचा, काम केले नाही तर मारहाण करायचा, त्यांना कोंबडा बनवायचा, एवढ्यावरच तो थांबला नव्हता तर त्याने चक्क विद्यार्थ्यांवर वारंवार लैंगिक अत्याचारही केले होते. खुद्द बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक भारती कोंडे यांनी सरकारतर्फे नोंदवलेल्या तक्रारीवरून १७ फेब्रुवारी २०१७ रोजी भादंविच्या ३७६(२)(ड)(आय)(एन), ३५४ (अ)(१), ५०६, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३(२)(व्ही),३(२)(व्हीए), ३(१) (डब्ल्यू)(१)(२) आणि लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण (पोक्सो)च्या कलम ६, १०, १७, २१ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. तो कारागृहात आहे. त्याने जामिनासाठी अर्ज दाखल केला असता न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळून लावला. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील अजय निकोसे यांनी काम पाहिले. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. व्ही. एन. मराठे हे या प्रकरणाचे तपास अधिकारी आहेत.