मुनिश्री प्रतीकसागरजी महाराज यांचे प्रवचननागपूर : सुगंथ हे ज्याप्रमाणे फुलांचे सार आहे, त्याचप्रमाणे चारित्र हे मनुष्याच्या जीवनाचे सार आहे. चारित्र्यवान व्यक्तीची संगत जीवनात यश प्राप्त करायला मदत करते, असे विचार आचार्य पुष्पदंतसागरजी महाराज यांचे शिष्य मुनिश्री प्रतीकसागरजी महाराज यांनी व्यक्त केले. शांतिनाथ दिगंबर जैन मंदिर, लक्ष्मीनगर येथे विराजमान असलेले प्रतीकसागरजी महाराज यांनी शुक्रवारी सकाळच्या सत्रात श्रावकांना संबोधित केले. प्रतीकसागरजी महाराज पुढे म्हणाले, माणसाने आपल्या जीवनाला तमाशा बनविण्यापेक्षा तीर्थ बनविणे आवश्यक आहे. तुमचे घर केवळ घर न राहता मंदिर झाले पाहिजे. घरी पूजापाठ व प्रार्थनेचे स्वर निनादतील तरच तुमचे घर हे मंदिर होईल, असे संबोधन त्यांनी श्रावकांना केले. प्रवचनाच्या अगोदर श्रावकांच्या हस्ते मंगलाचरण आणि दीप्र प्रज्वलन करण्यात आले. शनिवारी सकाळी ८.३० वाजता मुनिश्री प्रतीकसागरजी महाराज यांचे नागपूर मध्यवर्ती कारागृह येथे प्रवचन होणार आहे. त्यांनतर सकाळी ९ वाजता ते अजनी येथील राजू संघवी यांच्या घराकडे प्रस्थान करतील. येथे ते श्रावकांना संबोधित करतील. (प्रतिनिधी)उद्या इतवारी येथे स्वागतरविवारी १२ जून रोजी मुनिश्री प्रतीकसागरजी महाराज यांचे इतवारी येथील पार्श्वप्रभू दिगंबर जैन मोठे मंदिर येथे आगमन होणार आहे. सकाळी ७.३० वाजता चिटणीस पार्कजवळ महाल येथे त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे.
चारित्र्य हेच मनुष्य जीवनाचे सार
By admin | Updated: June 11, 2016 03:16 IST