शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

चाैफेर विकासाचे दावे गोपालनगरात ‘फोल’ ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात नागपूर शहरातील विकास कामांसाठी १ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात नागपूर शहरातील विकास कामांसाठी १ हजार कोटींचा निधी मिळाला. त्यांचा मतदार संघ असलेल्या दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रातील विकास कामांसाठी १५० कोटींचा विशेष निधी मिळाला. या भागातील सिमेंट रोड, सिवरेज लाइन, अंतर्गत रस्ते अन्य विकास कामांवर हा निधी खर्च झाला. या भागाचा चौफेर विकास झाल्याचा दावा मनपातील भाजपचे पदाधिकारी करतात; परंतु याच मतदार संघातील गोपालनगर भागात हा विकास पोहोचलेला नाही. केलेले दावेच फोल ठरले आहेत.

माटे चौक ते पडोळे चौकापर्यंतच्या एक किलोमीटर रस्त्यांची पार दुर्दशा झालेली आहे. जागोजागी खड्डे आहेत. या रस्त्यावर बाजार भरतो, हातठेले व भाजी विक्रेते उभे राहतात. आजूबाजूच्या नागरिकांना घरातून बाहेल पडणे अशक्य होते. गायत्रीनगर, कामगार कॉलनी, तुकडोजीनगर या भागात सिवरेजची गंभीर समस्या आहे. जनता सोसायटी लगतच्या गार्डनला अवकळा आली आहे. सर्वत्र गवत वाढले आहे. जीमची साधने बसविण्यात आली; परंतु झुडपे व गवतामुळे परिसरातील नागरिक व लहान मुलांना खेळता येत नाही. अशीच अवस्था मार्डन सोसायटीच्या मैदानाची झाली आहे. देखभाल नसल्याने अवकळा आली आहे. या भागातील सिवरेज लाइन जुन्या आहेत. दुरुस्ती नसल्याने विहिरींचे पाणी दूषित झाले आहे. पावसाळी नाल्यांचा अभाव आहे. मुख्य रस्त्यांवर जागोजागी सिवरेज लाइनसाठी खोदकाम सुरू असून मातीचे ढिगारे पडून असल्याने परिसरातील नागरिक त्रस्त आहेत.

.....

गार्डनला अवकळा

नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी शहरातील उद्यानात जीम बसविण्यात आले आहे. यावर कोट्यवधींचा खर्च करण्यात आला आहे. मात्र, हा खर्च पाण्यात तर गेला नाही ना? असा प्रश्न शहरातील उद्यानातील जीमची अवस्था बघून पडतो. अशीच अवस्था जनता सोसायटी येथील गार्डनची झाली झाली आहे. व्यायामाची साधने बसविण्यात आली; परंतु गवत व झुडपे वाढल्याने साधनांचा वापर करता येत नाही. गार्डनमध्ये असलेली झाडे तोडण्यात आली; परंतु नवीन झाडे लावली नाहीत. अशाने पर्यावरण संवर्धन कसे होणार, असा प्रश्न परिसरात वास्तव्यास असलेल्या नागरिकांना पडला आहे.

.....

जागोजागी कचरा, खुल्या प्लाॅटवर झाडे

जनता सोसायटी लगत मुख्य रस्त्याला लागून असलेल्या खुल्या भूखंडावर मोठी झाडे वाढली आहेत. येथे मातीचे ढीग व गवत वाढले आहे. त्यातच येथे कचरा टाकला जात असल्याने परिसरातील नागरिकांना डासांचा त्रास होतो. पावसाळ्याच्या दिवसांत पाण्याचा निचरा होत नाही. सिवरेज नादुरुस्त असल्याने नळाला दूषित पाणी येत असल्याबाबत वारंवार तक्रार करूनही मनपा प्रशासनाकडून याकडे लक्ष दिले जात नाही, अशी व्यथा या परिसरातील नागरिकांनी मांडली.

....

अशा आहेत समस्या

माटे चौक ते पडोळे चौकादरम्यानच्या रस्त्यांवर जागोजागी खड्डे.

सिवरेज नादुरुस्त असल्याने विहिरींचे पाणी दूषित.

उद्यानांच्या देखभालीकडे दुर्लक्ष.

पावसाळी नाल्यात कचरा साचल्याने पावसाळयात पाणी साचते.

खुल्या प्लाॅटवर कचरा साचून असल्याने डासांचा त्रास.

रस्त्यांवरील बाजारामुळे रहदारीला अडथळा.

....

नादुरुस्त रस्ता, बाजाराचा त्रास

गोपालनगरातील मुख्य रस्त्यांवर बाजार भरतो. हातठेले रस्त्यांवर उभे केले जातात. सायंकाळी नागरिकांना घराबाहेर पडणे अवघड होते. यातून विक्रेते व घरमालक यांच्यात वाद होतो. रस्त्यांची मागील दहा वर्षांत दुरुस्ती झालेली नाही. धुळीमुळे आजूबाजूच्या नागरिकांना त्रास होतो. अतिक्रमणाबाबत तक्रार करूनही मनपाकडून कारवाई केली जात नाही.

-आनंदराव वैरागडे, नागरिक

....

पावसाळ्यात साचते पाणी

माटे चौक ते पडोळे चौकादरम्यानचा रस्ता मागील अनेक वर्षांपासून नादुरुस्त आहे. रस्त्यांवर जागोजागी सिवरेज दुुरुस्तीसाठी वेळोवेळी खोदकाम केले जाते. त्याची माती व मलबा तसाच पडून राहतो. पावसाळ्याच्या दिवसांत पडोळे चौक परिसर जलमय होतो; परंतु मनपा प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे. साफसफाई दररोज होत नाही. रस्त्यावरील धुळीमुळे नागरिकांना त्रास होतो. नादुरुस्त सिवरेजमुळे परिसरातील नागरिक त्रस्त आहेत.

-नरेंद्र भगत, नागरिक

....

गार्डनमध्ये मुलांना खेळता येत नाही

जनता सोसायटी लगतच्या गार्डनमध्ये गवत व झुडपे वाढली असल्याने लहान मुलांना खेळता येत नाही. येथे जीमची साधने बसविण्यात आली; परंतु गार्डनची देखभाल होत नसल्याने परिसरातील नागरिकांना गार्डनमध्ये फिरता येत नाही. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. पावसाळ्याच्या दिवसात परिसरात पाणी साचते. सिवरेज लाइन लिकेज होण्याचीही समस्या आहे.

-मीना महाजन, नागरिक

....

रस्त्याची दुरुस्ती व्हावी

नागपूर शहरात सर्वत्र सिमेंट रोड होत आहेत. फूटपाथ चांगले होत आहेत. पावसाळी नाल्याची कामे होत आहेत; परंतु गोपालनगरातील मुख्य रस्ता मागील अनेक वर्षांपासून दुरुस्त करण्यात आलेला नाही. पावसाळी नाल्या व फुटपाथ नाही. यामुळे रस्त्यालगतच्या लोकांना धुळीचा त्रास होतो. पावसाळ्याच्या दिवसांत रस्त्यावर पाणी साचते. याकडे मनपा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

-मधुसूदन पाटील, नागरिक