शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

कावळ्यांच्या चोचीत बदल!

By admin | Updated: September 23, 2014 01:08 IST

पितृपक्षात पूर्वजांची पूजाअर्चा करून, त्यांना लावण्यात येणारा नैवेद्य कावळ्याला देण्याची परंपरा आहे. परंतु आज तो कावळाच दुर्मिळ होत चालला आहे. पक्षितज्ज्ञांच्या मते, कावळ्यांना पूर्वीप्रमाणे

संख्या घटली : पक्षिप्रेमी चिंतित योगेंद्र शंभरकर - नागपूर पितृपक्षात पूर्वजांची पूजाअर्चा करून, त्यांना लावण्यात येणारा नैवेद्य कावळ्याला देण्याची परंपरा आहे. परंतु आज तो कावळाच दुर्मिळ होत चालला आहे. पक्षितज्ज्ञांच्या मते, कावळ्यांना पूर्वीप्रमाणे मनुष्य सहवास व पर्याप्त खाद्य मिळत नसल्याने त्यांच्या चोचीच्या आकारात बदल होऊ लागला आहे. यासंबंधी केवळ नागपुरातच नव्हे तर अनेक शहरात करण्यात आलेल्या अध्ययनातून ही बाब पुढे आली आहे. ज्येष्ठ पक्षिप्रेमी व माजी मानद वन्यजीव रक्षक गोपाल ठोसर यांच्या मते, कोवळा व चिमण्यांचा कित्येक वर्षांपासून मनुष्यासोबत सहवास राहिला आहे. त्यांना मनुष्यासोबत राहण्याची सवय झाली आहे. त्यामुळे ते मनुष्याच्या सहवासात राहण्याचा प्रयत्न करतात. परंतु मनुष्याने त्यांची साथ सोडली आहे. पूर्वी कुटुंबातील सर्व सदस्य घरातील व्हरांड्यात जेवणाला बसायचे. त्याचवेळी घरासमोरच्या झाडावरील घरट्यात राहणारा कावळा किंवा चिमणी अचानक तेथे पोहोचून भाकरीचा तुकडा घेऊन जात होते. यातून त्यांची भूक भागत होती. परंतु आज व्हरांड्यातील ते सामूहिक भोजन बंद झाले असून, कवेलूच्या घराऐवजी स्लॅबच्या मोठमोठ्या इमारती उभा झाल्या आहेत. शिवाय त्यासाठी मोठमोठी झाडे तोडली जात आहेत. यामुळे पक्ष्यांना राहण्यासाठी घरटे आणि पोट भरण्यासाठी खाद्य मिळणे कठीण झाले आहे. सध्या शहरात हिरवळ असलेल्या परिसरातच पक्षी दिसून येतात. यात खामला, गड्डीगोदाम, मेडिकल कॉलेज व सुरेंद्रनगर परिसरात ते प्रामुख्याने आढळतात. (प्रतिनिधी)