शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गाळे वाटपासाठी बदलले नियम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 01:57 IST

कमल शर्मा । लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीत धक्कादायक अनियमितता उजेडात आली आहे. राज्य सरकारने सहकारी संस्थेचे जिल्हा विशेष लेखा परीक्षक ए.डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या चौकशी समितीच्या अहवालात अनियमिततेची पुष्टी झाली आहे. गाळे वाटपासाठी नियमात बदल करण्यावर सवाल उपस्थित करण्यात आले आहेत. समितीतील निवडक ...

ठळक मुद्देकृषी उत्पन्न बाजार समितीचा कारनामा : निवडक लोकांना लाभ, राज्याच्या चौकशी अहवालात ताशेरे

कमल शर्मा । लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीत धक्कादायक अनियमितता उजेडात आली आहे. राज्य सरकारने सहकारी संस्थेचे जिल्हा विशेष लेखा परीक्षक ए.डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या चौकशी समितीच्या अहवालात अनियमिततेची पुष्टी झाली आहे. गाळे वाटपासाठी नियमात बदल करण्यावर सवाल उपस्थित करण्यात आले आहेत. समितीतील निवडक लोकांना लाभ पोहोचविण्यासाठी हा खेळखंडोबा करण्यात आला आहे.लोकमतकडे उपलब्ध चौकशी अहवालात नमूद करण्यात आले आहे की, पंडित जवाहरलाल नेहरू मार्केट यार्ड परिसरातील ४४ गाळे वाटपावर ताशेरे ओढण्यात आले आहेत. यामध्ये फळ बाजारात २०, मिरची बाजारात १४ आणि आलू-कांदे बाजारातील १० दुकानांचा समावेश आहे. वाटपासाठी नियम आणि अटी लोकांच्या फायद्यासाठी बदलल्या आहेत. यासाठी १५ डिसेंबर २०१६ ला झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीची मदत घेण्यात आली आहे.अहवालानुसार, या बैठकीत गाळे वाटपासाठी नियमांमध्ये संशोधन करण्यात आले. दुकानांच्या लिलाव प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी ३२ अडतियांना नवीन परवाने देण्यात आले आहेत. यामध्ये शेख मुख्तार गफूर, अशरफी ट्रेडिंग कंपनी, धनराज मैनानी, राकेशकुमार कलवानी, अविनाश ओमप्रकाश फ्रूट कंपनी, राजेश छाबरानी, कन्हैयालाल छाबरानी, सुनील छाबरानी, गिरीश छाबरानी, अरुण राऊत आदींचा समावेश आहे.या प्रकारेच देखरेख रक्कम ०.५० टक्के केल्यामुळे कृषी उत्पन्न समितीला २६,०१, १७० रुपयांचा तोटा झाला आहे. समितीने गाळे वाटपात महाराष्ट्र राज्य विपणन मंडळाच्या महाव्यवस्थापकाांनी निर्धारित केलेल्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केल्याचे अहवालात नमूद केले आहे.पाच वर्षांचा कालावधी तीन महिन्यांवर आणलानियमानुसार गाळे घेणाºया व्यापाºयाला ७५ टक्के रक्कम देण्याकरिता पाच वर्षांपर्यत हप्ते द्यावे लागतात. पण बाजार समितीच्या संचालक मंडळाने हा कालवधी तीन महिन्यांपर्यंत कमी केला. या कारणामुळे अनेकजण लिलाव प्रक्रियेत सहभागी होऊ शकले नाहीत. याच प्रकारे गाळे न घेण्याच्या अटीवर व्यवसायासाठी परवाना घेण्याची अट ठेवली होती, हे अहवालात नमूद केले आहे.का बनली चौकशी समिती?भाजपा व्यापारी मोर्चाचे अध्यक्ष संजय वाधवानी यांनी १३ मार्च २०१७ ला बाजारातील अनियमिततेची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. फडणवीस यांच्या निर्देशानंतर सहकार विभागाने २७ मार्चला ए.डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली. या समितीत उपनिबंधक एन. एस. कंचेरी, सहायक निबंधक अशोक गिरी, टी. एन. चव्हाण आणि सहकार विभागाचे अधिकारी नरेश खोब्रागडे यांचा समावेश आहे.१४ ला मांडणार बाजूचौकशी अहवालावर उपनिबंधक कार्यालयाकडून दहा दिवसांत उत्तर देण्याचा नोटीस मिळाला आहे. ४ तारखेला उत्तर द्यायचे होते. पण अहवाल विस्तृत असल्यामुळे समितीने उत्तर देण्यासाठी वेळ मागितला आहे. आता १४ ला उत्तर देणार आहे. त्या दिवशी चौकशी अहवालावर बोलणार आहे.- अहमद शेख, सभापती, नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती