शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे ‘मातोश्री’वर गेले, उद्धव ठाकरे ‘शिवतीर्थ’वर कधी जाणार? ‘ते’ मुहूर्त तर हुकले, आता...
2
विवाहित पुरुषापासून दूर रहा...! कोर्टाचा महिलेला अजब आदेश, स्वत: विवाहित होती, तरी तिला...
3
नेपाळमध्ये ISI उभं करतंय नेटवर्क, 'बांगलादेशी मॉडेल'चा वापर; 'असा' रचला जातोय भारताविरोधी कट
4
अरे देवा! मुलगा वर्गात झोपला अन् शाळेला कुलूप लावून शिक्षक गेले घरी, जाग आल्यावर घाबरून...
5
९ महिन्यापूर्वी लव्ह मॅरेज अन् आज फेसबुकवर शेवटचा मेसेज लिहून जोडप्यानं संपवलं आयुष्य
6
शिवानी सोनारने घरी आणली Tata कंपनीची नवी कोरी कार, गाडीची किंमत माहितीये?
7
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
8
दागिन्यांनी मढवलेल्या पत्नीला बुलेटच्या टाकीवर बसवून फिरवलं, पोलिसांनी थेट १६००० हजारांचं चलान कापलं!
9
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
10
नात्यांना काळीमा फासणारी घटना; रेशन कार्ड बनवण्याच्या बहाण्याने घेऊन गेला अन् बायको पोरांना विकून आला!
11
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
12
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
13
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
14
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
15
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
16
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
17
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
18
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
19
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
20
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत

इतवारी रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘महान त्यागी बाबा जुमदेवजी रेल्वे स्थानक’ ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2023 19:46 IST

इतवारी रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘महान त्यागी बाबा जुमदेवजी रेल्वे स्थानक इतवारी, नागपूर’ असे ठेवावे, अशी मागणी रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी केली.

नागपूर :

इतवारी रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘महान त्यागी बाबा जुमदेवजी रेल्वे स्थानक इतवारी, नागपूर’ असे ठेवावे, अशी मागणी रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी केली. रेल्वेच्या बिलासपूर झोनची बैठक शुक्रवारी विभागीय रेल्वे कार्यालयात पार पडली. या बैठकीत खासदार तुमाने यांनी ही मागणी केली.

नागपूर विभागातील रेल्वेशी संबंधित प्रलंबित कामे आणि अडचणी तसेच नागरिकांच्या मागण्याच्या अनुषंगाने या बैठकीत प्रदीर्घ चर्चा झाली. बैठकीला खासदार सुनील मेंढे, खासदार बाळू धानोरकर, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोककुमार, व्यवस्थापक मनिंदर उप्पल आणि रेल्वेचे अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी रेल्वे प्रवाशांशी संबंधित समस्यांचा पाढा वाचून लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांपुढे अनेक मागण्या नोंदविल्या.नागपूर आणि नागभीड रेल्वे मार्गाचे काम तातडीने करावे, नागपूर - रिवा गोंडवाना एक्स्प्रेसला कामठी येथे दोन मिनिटांचा थांबा देण्यात यावा, रामटेक कन्हान रेल्वे मार्गाचा कल्व्हर्ट लहान असल्याने पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. त्यामुळे हे दूषित पाणी नागरिकांच्या घरात जाते आणि त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. याबाबतची संपूर्ण जबाबदारी रेल्वेची असूनही रेल्वेचे अधिकारी पालिकेकडे बोट दाखवून टाळाटाळ करतात. आमडी साटक रेल्वे मार्गवरील क्रॉसिंगपासून अंडरपास तयार व्हावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

याशिवाय कोरोनामुळे बंद करण्यात आलेली नागपूर - डोंगरगड मेमू पॅसेंजर गाडी पुन्हा सुरू करावी. महाराष्ट्र एक्स्प्रेसला निमखेडा (तरसा) स्थानकावरून जाते, निमखेडा (तारसा)मध्ये एनटीपीसी आणि अल्ट्राटेकसारख्या मोठ्या कंपन्या आहेत, आरोली, कोदामेंढी, तारसा, चाचेर येथील अनेक मजूर आणि स्थलांतरित या गाडीने प्रवास करतात. त्यामुळे नागपूर जाणाऱ्या महाराष्ट्र एक्स्प्रेसला निमखेडा (तारसा) स्थानकावर थांबा द्यावा, आदी मागण्याही या बैठकीत रेटण्यात आल्या. भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यांतील विविध मागण्यांच्या संबंधानेही बैठकीत मंथन झाले.

नागपूर-कोल्हापूरला ‘श्री विठ्ठल रुख्मिणी एक्स्प्रेस’ नाव द्याभारताच्या मध्यस्थानी असलेल्या नागपूर रेल्वे स्थानकावरून रोज १६० ते १६५ रेल्वे गाड्या धावतात. येथून नागपूर - कोल्हापूर ही द्विसाप्ताहिक गाडीही जाते. या गाडीला ‘श्री विठ्ठल रुख्मिणी एक्स्प्रेस’ नाव द्यावे, अशी मागणीही बैठकीत लोकप्रतिनिधींनी केली.