शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल ८८.१२ टक्के

By admin | Updated: May 30, 2017 18:15 IST

म. रा. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता १२वीचा निकाल मंगळवारी घोषित केला असून त्यात चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल ८८.१२ टक्के लागला आहे.

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : म. रा. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता १२वीचा निकाल मंगळवारी घोषित केला असून त्यात चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल ८८.१२ टक्के लागला आहे. निकालामध्ये मुली वरचढ ठरल्या आहेत. ९१.०४ टक्के मुली व ८५.७३ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. यावर्षी जिल्ह्यातून २९ हजार ७९० विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज केला. त्यापैकी २९ हजार ७६७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्यावर २६ हजार २८९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामध्ये नोंदणी करणारे १५ हजार ३०५ विद्यार्थी आणि १४ हजार ४८५ विद्यार्थिनींनी होत्या. त्यापैकी १५ हजार २८७ मुले व १४ हजार ४८० मुलींनी परीक्षा दिली. निकालामध्ये १३ हजार १०६ विद्यार्थी व १३ हजार १८३ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांपेक्षा कमी मुलींनी परीक्षा दिली तरी उत्तीर्ण मुलींची संख्या अधिक आहे. सर्वात कमी निकाल कला शाखेचा लागला आहे. सर्वाधिक विज्ञान शाखेचा ९६.८८ टक्के, वाणिज्य शाखा ८८.०१ टक्के, व्होकेशनल शाखा ८६.६४ टक्के आणि कला शाखेचा ८२.६६ टक्के निकाल लागला आहे. कला शाखेत १५ हजार २६३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्यावर १२ हजार ६१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेत १० हजार ५०९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून त्यापैकी १० हजार १८१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेत २ हजार ३०१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून २ हजार २५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर व्होकेशनल शाखेत १ हजार ६९४ विद्यार्थ्यांपैकी १ हजार ४६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.