शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

रंग बदलणारा शामेलियन सरडा नागपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:07 IST

नागपूर : ‘गिरगीट की तरह रंग बदलते हाे तुम,’ असे एखाद्याला आपण म्हणताे. असा हा रंग बदलण्यात माहीर असलेला ...

नागपूर : ‘गिरगीट की तरह रंग बदलते हाे तुम,’ असे एखाद्याला आपण म्हणताे. असा हा रंग बदलण्यात माहीर असलेला गिरगीट अर्थात शामेलियन नावाचा दुर्मीळ सरडा नागपुरात पाहायला मिळाला. गाेधनी परिसरातून रेस्क्यू करून वन विभागाच्या स्वाधीन करण्यात आला.

सरडा प्रजातीत माेडणारा शामेलियन हा ओबडधाेबड दिसणारा प्राणी ज्युरासिक पार्कच्या डायनासाेरशी साधर्म्य साधणारा आहे. बुधवारी नागरिकांना ताे गाेधनी भागातील रस्त्यावर दिसून आला. सामान्यत: सरडा पाहिल्यावर कुणाला आश्चर्य वाटणार नाही; पण शामेलियनच्या रूपामुळे ताे भीतीदायकही वाटताे. त्यामुळे नागरिकांनी सर्पमित्र शुभम पराळे यांना माहिती दिली. शुभमने घटनास्थळी जाऊन या सरड्याला रेस्क्यू केले. गुरुवारी त्याला वन विभागाच्या स्वाधीन करण्यात आले.

शामेलियनची वैशिष्ट्ये

शामेलियन हा अतिशय शांत व बिनविषारी जीव आहे. भारतभर सरड्याच्या प्रजाती आढळतात. शेतात, परसबागेत, रस्त्यावर, झाडांवर ताे सहज दिसताे; पण शामेलियन त्यांच्यापेक्षा वेगळा आहे. शामेलियन मुख्यत्वे आफ्रिका, दक्षिण युराेप, दक्षिण आशिया व श्रीलंकेत आढळताे; मात्र ताे भारतात आढळणाऱ्या इतर प्रजातीपेक्षा वेगळा आहे. त्याच्या दिसण्यापासून ते असण्यापर्यंत. खडबडीत शरीर, चपट्या केल्यासारख्या बगला, एकावर एक तीन शारस्त्राण घातल्यासारखं डाेकं, कडबाेळ्यासारखी वळलेली शेपूट, शरीराला न शाेभणारे लुकडे पाय असे त्याचे रूप. ताे सहसा झाडावरच राहताे. तहान लागल्यावर पानावर पडलेले दवबिंदू पिताे; मात्र सरड्याची मादी जमीन उकरून त्यात अंडी घालते. शामेलियनची जीभ म्हणजे त्याचे शस्त्र. आठ ते नऊ इंच लांब गुलाबीसर जिभ आपल्या चिकट टोकाने भक्षाला खेचून घेते. किडे माकोडे, भुंगे, फ़ुलपाखरं, मोठे मुंगळे हे त्याचे खाद्य. डाेळेही वैशिष्ट्यपूर्ण असतात. ते शंकुप्रमाणे स्वतंत्र वेगवेगळ्या दिशांना फिरू शकतात. रंग बदलणे ही त्याची माेठी क्षमता. शत्रूपासून बचाव करण्यासाठी त्याला मिळालेली ही देगणी. शरिरातल्या रंगपेशी शक्यतो सभाेवतालच्या रंगानुरूप हुबेहूब रंग धारण करण्याची क्षमता त्यांच्यात असते.