शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

केंद्रीय कृषी कायद्यावरील स्थगितीला आव्हान; हायकोर्टात याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 07:00 IST

High court, Nagpur News शेतकरी उत्पन्न व्यापार आणि व्यवहार (प्रचलन व सुविधा) कायद्याच्या अंमलबजावणीवरील स्थगितीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे.

ठळक मुद्देवादग्रस्त आदेश अवैध असल्याचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकरी उत्पन्न व्यापार आणि व्यवहार (प्रचलन व सुविधा) कायद्याच्या अंमलबजावणीवरील स्थगितीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी संबंधित स्थगिती दिली आहे. त्यांचा हा वादग्रस्त आदेश अवैध असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.दिलीप चालाख, पत्रू पिपरे व जीवन कोटमवार या शेतकऱ्यांनी ही याचिका दाखल केली आहे. याचिकेत सहकार व पणन मंत्री, पणन संचालनालय, केंद्रीय विधी व न्याय मंत्रालय, कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय आणि सातारा जिल्ह्यातील कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.शेतकरी, व्यापारी व इतर संबंधितांना नोंदणीकृत बाजार समितीच्या बाहेर कृषी उत्पन्नाची खरेदी-विक्री करता यावी, राज्यांतर्गत व आंतर राज्य व्यापाराला प्रोत्साहन मिळावे, कृषी उत्पन्न पणन व परिवहन खर्च कमी करणे, शेतकऱ्यांना कृषी उत्पन्नाचा चांगला दर मिळवून देणे, ई-व्यापाराकरिता सुविधा निर्माण करणे इत्यादी उद्देशाने केंद्र सरकारच्या वतीने ५ जून २०२० पासून शेतकरी उत्पन्न व्यापार आणि व्यवहार (प्रचलन व सुविधा) अध्यादेश लागू करण्यात आला. त्याला २७ सप्टेंबर रोजी लोकसभा व राज्यसभेत मंजुरी मिळाली.राष्ट्रपतींनीही मान्यता प्रदान केली. या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी याकरिता पणन संचालकांनी २४ जून व १० आॅगस्ट रोजी सर्व जिल्हा उपनिबंधक व बाजार समित्यांना परिपत्रक जारी केले होते.दरम्यान, आमदार शशिकांत शिंदे यांनी या परिपत्रकांविरुद्ध महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन) अधिनियमातील कलम ४३ अंतर्गत सहकार व पणन मंत्र्यांकडे अपील दाखल केले. त्या अपीलवरील सुनावणीनंतर ३० सप्टेंबर रोजी सहकार व पणन मंत्र्यांनी दोन्ही परिपत्रकांवर स्थगिती दिली. त्यांच्या या कृतीमुळे राज्यघटनेतील तरतुदींचे उल्लंघन झाले, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.आदेश अवैध ठरविण्याची मागणीस्थगितीचा वादग्रस्त आदेश अवैध घोषित करून रद्द करण्यात यावा, शेतकरी व व्यापाऱ्यांकडून सेस, बाजारशुल्क इत्यादी कर आकारण्यास मनाई करण्यात यावी यासह अन्य मागण्या याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला केल्या आहेत. याचिकेवर सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. एम. अनिलकुमार कामकाज पाहतील.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय