शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत ले-आऊट नियमित करण्याच्या तरतुदीला आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:08 IST

नागपूर : राज्य सरकारने ३१ डिसेंबर २०२० पर्यंतचे अनधिकृत ले-आऊट नियमित करण्यासाठी २००१ मधील महाराष्ट्र गुंठेवारी कायद्यात दुरुस्ती केली ...

नागपूर : राज्य सरकारने ३१ डिसेंबर २०२० पर्यंतचे अनधिकृत ले-आऊट नियमित करण्यासाठी २००१ मधील महाराष्ट्र गुंठेवारी कायद्यात दुरुस्ती केली आहे़ या नवीन तरतुदीच्या वैधतेला व्यावसायिक अजय तिवारी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे़ यासंदर्भात त्यांनी जनहित याचिका दाखल केली आहे़

गुंठेवारी कायद्यात अनधिकृत ले-आऊटना प्रतिबंध घालण्याचा उल्लेख करण्यात आला आहे़ असे असताना २००१ पासून आतापर्यंत एकट्या नागपुरातील सुमारे ५००० अनधिकृत ले-आऊट नियमित करण्यात आले आहेत़ त्यासाठी मैदाने, उद्याने इत्यादीच्या सुमारे ७००० एकर जमिनीशी तडजोड करण्यात आली आहे़ प्रशासनाने आतापर्यंत अर्धे शहर नियमित केले आहे़ त्यावरून सरकारला अनधिकृत ले-आऊटना प्रतिबंध घालण्यापेक्षा असे ले-आऊट नियमित करण्यामध्ये अधिक रुची असल्याचे सिद्ध होत आहे़ त्यामुळे संपूर्ण शहर काँक्रिटचे जंगल झाले आहे़ समाज व विकासकांना जमीन खरेदी करून अवैध ले-आऊट विकण्याची सवय लागली आहे़ करिता, ३१ डिसेंबर २०२० पर्यंतचे अनधिकृत ले-आऊट नियमित करण्याची तरतूद अवैध घोषित करून रद्द करण्यात यावी, अशी विनंती याचिकाकर्त्याने न्यायालयाला केली आहे़ याचिकेत राज्य नगर विकास विभाग, नागपूर सुधार प्रन्यास, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, महानगरपालिका, जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांना प्रतिवादी करण्यात आले आहे़ याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. एम़ अनिलकुमार कामकाज पाहणार आहेत़

---------------------

प्रशासन कर्तव्य बजावण्यात अपयशी

प्रशासन कर्तव्याचे काटेकोर पालन करण्यास अपयशी ठरत आहे़ परिणामी, सर्रास अनधिकृत ले-आऊट पाडले जात आहेत़ त्यावर अनधिकृत बांधकामे केली जात आहेत़ प्रशासन संबंधिताना केवळ नोटीस बजावून गप्प बसते़ ठोस कारवाई करीत नाही़ यावरून न्यायालयाने वेळोवेळी राज्य सरकार व प्रशासनाला फटकारले; पण परिस्थितीत काहीच फरक पडला नाही, असा आरोप याचिकाकर्त्याने केला आहे़