शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मतांची फूट टाळण्याचे विदर्भवाद्यांसमोर आव्हान

By admin | Updated: January 19, 2017 02:39 IST

आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी विदर्भवाद्यांनीदेखील दंड थोपटले आहेत. नगर परिषद निवडणुकांत यश

तिरपुडेंचा ‘विदर्भ माझा’ व अणेंची ‘विरा’ रिंगणात : समन्वय साधण्याचे प्रयत्न सुरू योगेश पांडे   नागपूर आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी विदर्भवाद्यांनीदेखील दंड थोपटले आहेत. नगर परिषद निवडणुकांत यश मिळविणारा ‘विदर्भ माझा’ व राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्या पुढाकारातून निर्माण झालेला ‘विदर्भ राज्य आघाडी’ हे केवळ विदर्भ हाच मुद्दा घेऊन निवडणुकांत उतरणार आहेत. शहरातील काही जागांवर हे दोन्ही पक्ष आमनेसामने येण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत विदर्भवाद्यांची मते दुभंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पेचातून मार्ग कसा काढायचा याबाबत पक्षांमध्ये विचार सुरू आहे. एरवी दर निवडणुकांत विविध पक्षांकडून प्रचारात विदर्भाचा मुद्दा असतो. मात्र गेल्या काही काळापासून वेगळ््या विदर्भ राज्याच्या मागणीने परत जोर धरला आहे. यंदा केवळ विदर्भ हाच मुद्दा घेऊन राजकुमार तिरपुडे यांचा ‘विदर्भ माझा’ व अणे यांची ‘विरा’ निवडणुकांत उतरणार आहे. वेगळ््या विदर्भाच्या मुद्याला परत ऐरणीवर आणणारे अ‍ॅड. श्रीहरी अणे हे स्वत: प्रचारात उतरणार आहेत. या पार्श्वभूमीवर ‘विरा’च्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. दुसरीकडे काटोल नगर परिषदेवर विजयाचा झेंडा फडकविणारा ‘विदर्भ माझा’ पक्षदेखील चांगलाच चर्चेत आहे. ‘विदर्भ माझा’कडूनदेखील नागपूर मनपा निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे. अशा स्थितीत या दोन्ही पक्षांचे उमेदवार आमनेसामने आल्यास विदर्भवादी मतदारांची मते दुभंगण्याची शक्यता आहे. असे झाले तर दोन्ही पक्षांचे नुकसानच होणार आहे. हीच बाब लक्षात घेता दोन्ही पक्षांमध्ये समन्वय सुरू आहे. मात्र अद्याप कुठलाही अंतिम निर्णय झाला नसल्याने निवडणुकांत काय होणार हा प्रश्न कायम आहे. विदर्भवादी पक्षांची मोट बांधणार कशी ? मनपा निवडणुकांत सर्व जागांवर निवडणूक लढणार असल्याची घोषणा ‘विदर्भ माझा’तर्फे अगोदरच करण्यात आली आहे. त्यांनी आठ उमेदवार घोषितही केले आहेत. दुसरीकडे सद्यस्थितीत ‘विरा’ने केवळ एकाच प्रभागात उमेदवार उतरविण्याची घोषणा केली आहे. लहानमोठ्या १८ विदर्भवादी पक्षांची मोट बांधण्याचे अणे यांच्याकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळे नेमक्या किती ठिकाणी ‘विरा’ निवडणूक लढणार हे निश्चित झालेले नाही. मात्र ही मोट बांधणार कशी हा प्रश्नदेखील अनुत्तरितच आहे. तिरपुडे म्हणतात, जो जिता वही सिकंदर यासंदर्भात ‘विदर्भ माझा’चे संस्थापक राजकुमार तिरपुडे यांच्याशी संपर्क साधला असता, आम्ही सर्व जागांवर निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विदर्भाच्या नावावर अनेक पक्ष निवडणूक लढत आहेत. मात्र राजकीय आखाड्यात जो जिंकतो तोच सिकंदर ठरतो. विदर्भवाद्यांची मते दुभंगतील असे वाटत नाही, असे ते म्हणाले. दुसरीकडे ‘विरा’चे अध्यक्ष रवी संन्याल यांनी मात्र ‘विदर्भ माझा’सोबत समन्वय साधणार असल्याचे सांगितले. नेमक्या किती ठिकाणी ‘विरा’ निवडणूक लढेल हे सांगता येत नाही. मात्र विदर्भवाद्यांची मते फुटू नयेत यासाठी आम्ही अणे यांच्या नेतृत्वात पुढाकार घेऊ.