शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

‘एफआयआर’संदर्भातील अटीच्या वैधतेला आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 12:15 IST

सक्षम अधिकाऱ्याची परवानगी घेतल्याशिवाय सरकारी नोकराविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात येऊ नये या अटीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे.

ठळक मुद्देहायकोर्टात याचिका केंद्र व राज्य सरकारला नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सक्षम अधिकाऱ्याची परवानगी घेतल्याशिवाय सरकारी नोकराविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात येऊ नये या अटीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. सुशिला खोब्रागडे यांनी यासंदर्भात याचिका दाखल करून ही अट राज्यघटनेतील तरतुदींविरुद्ध असल्याचा दावा केला आहे. राज्य सरकारने २०१६ मध्ये फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) कलम १५६ (३) मध्ये सुधारणा करून या अटीचा समावेश केला आहे.याचिकेवर शुक्रवारी न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने केंद्रीय विधी व न्याय मंत्रालय, राज्य विधी व न्याय मंत्रालय व इतर प्रतिवादींना नोटीस बजावून यावर १५ एप्रिलपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिलेत. तसेच, देशाचे सॉलिसिटर जनरल व राज्याचे महाधिवक्ता यांना या प्रकरणाची माहिती देण्यास सांगितले.खोट्या व राजकारणप्रेरित तक्रारींपासून सरकारी नोकरांचे संरक्षण करण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्यात आल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. परंतु, सरकारी नोकरांना आधीच विविध कायद्यांचे संरक्षण आहे. असे असताना सरकारी नोकराविरुद्ध गुन्हा नोंदवणे सरकारी इच्छाशक्तीवर अवलंबून ठेवण्यात आले आहे.राज्यघटनेनुसार नागरिकांना सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय देणे अनिवार्य आहे. सीआरपीसीमधील सुधारित तरतूद या अधिकारांचे उल्लंघन करणारी आहे. त्यामुळे वादग्रस्त तरतुदीची वैधता तपासणे गरजेचे आहे असे याचिकाकर्तीचे म्हणणे आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय