शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खासगींना कोरोना रुग्णालय घोषित करण्याला आव्हान : हायकोर्टात याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 00:57 IST

खासगी रुग्णालयांना कोरोना रुग्णालय घोषित करण्यासाठी जारी अधिसूचनेच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी राज्य सरकार व महानगरपालिका आयुक्त यांना नोटीस बजावून २ सप्टेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.

ठळक मुद्दे राज्य सरकारला नोटीस जारी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : खासगी रुग्णालयांना कोरोना रुग्णालय घोषित करण्यासाठी जारी अधिसूचनेच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी राज्य सरकार व महानगरपालिका आयुक्त यांना नोटीस बजावून २ सप्टेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अविनाश घरोटे यांच्यासमक्ष सुनावणी झाली.ही याचिका धंतोली नागरिक मंडळाने दाखल केली आहे. मनपा आयुक्तांनी वादग्रस्त अधिसूचनेच्या आधारावर शहरातील अनेक खासगी रुग्णालयांना कोरोना रुग्णालय घोषित केले आहे. कायद्यानुसार मनपा आयुक्त असे आदेश जारी करू शकत नाहीत. धंतोली परिसरात मोठ्या संख्येत खासगी रुग्णालये आहेत. तिथे रोज हजारो रुग्ण व त्यांचे नातलग येतात. त्यामुळे परिसरात सतत गर्दी असते. तसेच, या परिसरात दाट लोकवस्ती आहे. या परिस्थितीत येथील खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार केले गेल्यास परिसरातील नागरिकांना संक्रणाचा धोका होईल. परिणामी, धंतोलीतील खासगी रुग्णालयांना कोरोना रुग्णालय घोषित करण्याचे आदेश रद्द करण्यात यावे असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. आशुतोष धर्माधिकारी व अ‍ॅड. अश्विन देशपांडे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल