शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील सात महिन्याच्या बाळाला कोरोनामुक्त ठेवण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 00:09 IST

आई-वडिलांचे नमुने पॉझिटिव्ह तर सात महिन्याच्या चिमुकल्याचे नमुने निगेटिव्ह आल्याने या बाळाला कोरोनामुक्त ठेवण्याचे आव्हान आई-वडील सोबतच डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी गेल्या १३ दिवसांपासून पेलत आहे.

ठळक मुद्देमेडिकलचे विशेष लक्ष : डॉक्टर, परिचारिका बनल्या आई, दूध पाजण्यासह घेताहेत काळजी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : आई-वडिलांचे नमुने पॉझिटिव्ह तर सात महिन्याच्या चिमुकल्याचे नमुने निगेटिव्ह आल्याने या बाळाला कोरोनामुक्त ठेवण्याचे आव्हान आई-वडील सोबतच डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी गेल्या १३ दिवसांपासून पेलत आहे. दूध पाजण्यापासून ते इतरही काळजी घेतली जात आहे. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) इतिहासात एक नवीन अध्याय लिहिला जात आहे. सतरंजीपुऱ्यातील कोरोनाबाधित ६८ वर्षीय मृताच्या व त्यांच्या नातेवाईकांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन करणे सुरूच आहे. सुरुवातीला मृताच्या मुलाला आणि त्याच्या पत्नीला आणि सात महिन्यांच्या चिमुकल्याला मेडिकलमध्ये सहा एप्रिल रोजी दाखल केले. या सर्वांचे नमुने तपासले असता आई-वडील पॉझिटिव्ह आले, तर चिमुकला निगेटिव्ह आला. या तिघांना मेडिकलच्या पेर्इंग वॉर्डात दाखल केले. कोरोनाचा धोका लक्षात घेऊन डॉक्टरांनी बाळाला नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यास सांगितले, परंतु जवळचे सर्वच नातेवाईक पॉझिटिव्ह येत असल्याने त्यांनी नकार दिला. आईचे दूध वाटीत काढून दुसºया कोणाकडून बाळाला चमच्याने पाजण्याचा दुसरा पर्याय डॉक्टरांनी सुचविला, परंतु आईने नकार दिला. शेवटी आईनेच बाळाला दूध पाजताना विशेष काळजी घेण्याचा पर्याय समोर आला. दूध पाजण्यापूर्वी हात स्वच्छ धुणे, तोंडाला मास्क बांधणे व इतरही प्रतिबंधात्मक उपाय डॉक्टरांनी सुचविले. त्यानुसार आई-वडील खबरदारी घेत आहेत. विशेष म्हणजे, इतर वेळी डॉक्टर, परिचारिका बाळाचा सांभाळ करीत आहेत. या बाळाचे नमुने २४ तासानंतर तपासणीसाठी पाठविले जात आहेत. बाळाच्या प्रकृतीकडे बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. दीप्ती जैन तर आई-वडिलांच्या प्रकृतीकडे औषधवैद्यकशास्त्र विभागाचे डॉ. राजेश गोसावी व त्यांची चमू लक्ष ठेवून आहेत.पसर्नल हायजीनकडे विशेष लक्षआईच्या दूधातून कोरोना होत नाही, असे आतापर्यंतच्या अभ्यासातून समोर आले आहे. परंतु बाळाला दूध पाजताना योग्य खबरदारी घेणे आवश्यक आहे. जसे हात स्वच्छ धुणे, तोंडाला मास्क बांधणे व या शिवाय, पसर्नल हायजीन फार महत्त्वाची आहे. बाळाच्या व दोन्ही रुग्णांच्या प्रकृतीकडे मेडिसीन व पेडियाट्रिक विभाग लक्ष ठेवून आहे.डॉ. अविनाश गावंडे, वैद्यकीय अधीक्षक, मेडिकल

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल