शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

नक्षल्यांच्या दहशतीत मतदान प्रक्रियेचे पोलिसांसमोर आव्हान

By admin | Updated: September 23, 2014 01:03 IST

या नक्षलग्रस्त जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान शांततेत पार पडणे हे पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान राहणार आहे. नक्षलवाद्यांचा लोकशाही प्रक्रियेला विरोध असून त्यांनी यावेळी

पॅरामिल्ट्री फोर्सेसही लागणार : नक्षलग्रस्त भागात ३ वाजेपर्यंतच राहणार मतदानगडचिरोली : या नक्षलग्रस्त जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान शांततेत पार पडणे हे पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान राहणार आहे. नक्षलवाद्यांचा लोकशाही प्रक्रियेला विरोध असून त्यांनी यावेळी मतदानावर बहिष्कार घालण्याचे आव्हान पत्रकाद्वारे केले आहे. जिल्ह्याच्या अनेक दुर्गम भागात हे पत्रक टाकले जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक तसेच मतदारांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. दुसरीकडे प्रशासनाने नक्षलग्रस्त भागात सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मतदानाची वेळ ठेवली असून मोठ्या प्रमाणावर मतदान व्हावे, यासाठी व्यापक जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. तीन विधानसभा क्षेत्रात प्रशासनाने निवडणूक एक्सप्रेस नावाचा रथही जनजागृतीसाठी तयार केला आहे. जिल्ह्यातील आरमोरी, अहेरी, गडचिरोली या तीन विधानसभा मतदार संघात एकूण ८९३ मतदान केंद्र आहेत. यापैकी १८३ मतदान केंद्र अतिसंवेदनशील आहेत. तर २३४ मतदान केंद्र संवेदनशील आहेत. अतिसंवेदनशिल मतदान केंद्रांमध्ये आरमोरी विधानसभा क्षेत्रातील ६१, गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील २५ व अहेरी विधानसभा क्षेत्रातील सर्वाधिक ९७ मतदान केंद्रांचा समावेश आहे. या मतदान केंद्रांवर गडचिरोली जिल्हा पोलीस दलाचे शेकडो जवान तसेच राज्य राखीव पोलीस दल, केंद्रीय राखीव पोलीस दल यांचेही तेवढेच जवान तैनात करावे लागतात. मतदान केंद्रापासून १५ ते २० किमी अंतरावरून मतदारांना येथे मतदानासाठी आणावे लागते. यंदा गडचिरोली जिल्हा प्रशासनाने मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी वाहनाचीही व्यवस्था केली आहे.बुलेटला बॅलेटने उत्तर देण्यासाठी गडचिरोली पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. गेल्या काही निवडणुकांमध्ये नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर घातपाताच्या घटना घडविण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीचे वेळीही अहेरी तालुक्यात बेस कॅम्पवरून पोलींग पार्टी परत आणताना नक्षली हल्ल्यात एक जवान शहीद झाला होता. यावेळी नक्षलवाद्यांच्या दहशतीमुळे काही मतदान केंद्र ऐनवेळी बदलविले जाऊ शकतात, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. (जिल्हा प्रतिनिधी)