शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील नऊ आमदारांच्या निवडणुकीला आव्हान

By admin | Updated: June 17, 2015 03:00 IST

गेल्यावर्षी विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, डॉ. मिलिंद माने, डॉ. देवराव होळी, कीर्तीकुमार

हायकोर्टात याचिका : आठ भाजपचे तर एक काँगे्रसचाराकेश घानोडे ल्ल नागपूरगेल्यावर्षी विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, डॉ. मिलिंद माने, डॉ. देवराव होळी, कीर्तीकुमार भांगडिया, राजू तोडसाम, सुनील केदार, मल्लिकार्जुन रेड्डी, राजेश काशीवार व रामचंद्र अवसरे या विदर्भातील नऊ आमदारांविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात निवडणूक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. यापैकी केवळ सुनील केदार हे काँग्रेसचे तर, उर्वरित सर्व भाजपाचे आमदार आहेत.मतदार अ‍ॅड. सतीश उके यांनी देवेंद्र फडणवीस, बहुजन समाज पक्षाचे उमेदवार किशोर गजभिये यांनी डॉ. मिलिंद माने, आॅल इंडिया फॉर्वर्ड ब्लॉक पक्षाचे उमेदवार नारायण जांभुळे यांनी डॉ. देवराव होळी, शिवसेनेचे उमेदवार गजानन बुटके यांनी कीर्तीकुमार भांगडिया, शरीफ खा वझीर खा यांच्यासह सात मतदारांनी राजू तोडसाम, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सोनबा मुसळे यांनी सुनील केदार, शिवसेनेचे उमेदवार आशिष जयस्वाल यांनी मल्लिकार्जुन रेड्डी, काँग्रेसचे उमेदवार सेवकभाऊ वाघाये यांनी राजेश काशीवार तर, रणजित चव्हाण यांनी रामचंद्र अवसरे यांच्याविरुद्ध निवडणूक याचिका दाखल केली आहे. देवेंद्र फडणवीस हे खुल्या प्रवर्गासाठी राखीव दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघ, डॉ. मिलिंद माने अनुसूचित जातीकरिता राखीव उत्तर नागपूर मतदारसंघ, डॉ. देवराव होळी अनुसूचित जमातीकरिता राखीव गडचिरोली मतदारसंघ, कीर्तीकुमार भांगडिया खुल्या प्रवर्गासाठी राखीव चिमूर मतदारसंघ, राजू तोडसाम अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव आर्णी (यवतमाळ) मतदारसंघ, सुनील केदार खुल्या प्रवर्गासाठी राखीव सावनेर मतदारसंघ, मल्लिकार्जुन रेड्डी खुल्या प्रवर्गासाठी राखीव रामटेक मतदारसंघ, राजेश काशीवार खुल्या प्रवर्गासाठी राखीव साकोली (भंडारा) मतदारसंघ तर, रामचंद्र अवसरे हे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव भंडारा विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. या आमदारांवर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करण्यात आले आहेत. त्यांची निवडणूक रद्द करून संबंधित मतदारसंघात नव्याने निवडणूक घेण्यात यावी अशी याचिकाकर्त्यांची विनंती आहे.विशेष न्यायपीठांची स्थापना४निवडणूक याचिकेवर सुनावणी करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींकडून विशेष न्यायपीठाची स्थापना करण्यात येते. त्यानुसार, देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्धच्या याचिकेवर सुनावणीसाठी न्यायमूर्ती आर.के. देशपांडे, डॉ. मिलिंद माने व मल्लिकार्जुन रेड्डी यांच्याविरुद्धच्या याचिकेवर सुनावणीसाठी न्यायमूर्ती सुनील शुक्रे, डॉ. देवराव होळी व राजू तोडसाम यांच्याविरुद्धच्या याचिकेवर सुनावणीसाठी न्यायमूर्ती झेड.ए. हक, कीर्तीकुमार भांगडिया यांच्याविरुद्धच्या याचिकेवर सुनावणीसाठी न्यायमूर्ती अतुल चांदुरकर तर, रामचंद्र अवसरे व राजेश काशीवार यांच्याविरुद्धच्या याचिकेवर सुनावणीसाठी न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांचे विशेष न्यायपीठ स्थापन करण्यात आले आहे. सुनील केदार यांच्याविरुद्धच्या याचिकेवर सुनावणीसाठी न्यायमूर्ती आर. के. देशपांडे यांचे विशेष न्यायपीठ स्थापन करण्यात आले होते. परंतु, न्यायमूर्ती देशपांडे यांनी काही कारणास्तव ही याचिका ‘नॉट बिफोर मी’ केली. यामुळे याचिकेसाठी नवीन न्यायपीठ स्थापन होणार आहे. न्यायालयाने संबंधित आमदार व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना नोटीस बजावून उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.