शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

चाैघांचा कन्हान नदीत बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:06 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क खापरखेडा (नागपूर) : वाकी (ता. सावनेर) परिसरात पार्टी करायला आलेल्या नागपूर शहरातील आठ जणांपैकी चाैघे पाेहण्यासाठी ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

खापरखेडा (नागपूर) : वाकी (ता. सावनेर) परिसरात पार्टी करायला आलेल्या नागपूर शहरातील आठ जणांपैकी चाैघे पाेहण्यासाठी कन्हान नदीच्या पात्रात उतरले. पाेहताना पाण्याचा अंदाज चुकला आणि चाैघेही डाेहात गेल्याने बुडाले. यातील एकाचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात पाेलिसांना यश आले. ही घटना खापा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील वाकी शिवारातील कन्हान नदीच्या पात्रात मंगळवारी (दि. २२) दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.

बुडालेल्या युवकांमध्ये ताेफिक आशिफ खान (१६, रा. शांतिनगर, नागपूर), प्रवीण गलाेरकर (१७, रा. जयभीम चाैक, यादवनगर, नागपूर), अतेश शेख नासिर शेख (१७, व्हीएचबी काॅलनी, नागपूर) व आरीफ अकबर पटेल (१६, रा. जयभीम चाैक, यादवनगर, नागपूर) या चाैघांचा समावेश असून, अतेशचा मृतदेह शाेधण्यात पाेलिसांना यश आले आहे.

या चाैघांसह तेजू प्रदीप पाेटपसे (२०, रा. पाचपावली, नागपूर), शायान रियाज काजी (१८, व्हीएचबी काॅलनी, नागपूर), पलाश जितेश जाेशी (२०, रा. तीननल चाैक, नागपूर) व विशाल भाईलाल चव्हाण (२५, रा. इंदिरामाता नगर, नागपूर) मंगळवारी दुपारी वाकी (ता. सावनेर) परिसरात पार्टी करायला हाेते. सर्व जण लगतच्या कन्हान नदीच्या काठावर फिरायला गेले. त्यातच ताेफिक, प्रवीण, अतेश व आरिफ पाेहण्यासाठी नदीच्या पात्रात उतरले, तर तेजू, शायान, पलाश व विशाल काठावर बसून हाेते.

काही वेळात चाैघेही पात्रात डाेहाच्या दिशेने गेले आणि खाेल पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले. पाण्याबाहेर पडणे शक्य न झाल्याने चाैघेही बुडाले. माहिती मिळताच खापा पाेलिसांसह एसडीआरएफचे जवान घटनास्थळी दखल झाले. त्यांनी सायंकाळी ४.०५ वाजण्याच्या सुमारास अतेशचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. सायंकाळपर्यंत शाेधकार्य सुरू हाेते.

....

मुंबईहून आलेल्या मित्रांसाठी पार्टी

या आठ जणांपैकी एक मुंबईला राहताे. ताे नागपूरला आल्याने सर्वांनी वाकी परिसरातील द्वारका रिसाॅर्ट येथे पार्टीचा बेत आखला. या ठिकाणी पाेहाेचल्यावर त्यांना द्वारका रिसाॅर्ट बंद असल्याचे तसेच तिथे पार्टी करणे शक्य नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे सर्व जण जवळच असलेल्या कन्हान नदीच्या तीरावर फिरायला गेले आणि संकट ओढवून घेतले.

...

सूचना फलकाकडे दुर्लक्ष

हे सर्व जण ज्या ठिकाणी पाेहायला गेले, त्या ठिकाणी महसूल विभागाने फलक लावला आहे. या ठिकाणी नदीत असलेला डाेह धाेकादायक असून, कुणीही पाण्यात उतरू नये, असे आवाहनही या फलकाद्वारे तहसीलदारांनी केले आहे. मात्र, सर्वांनी याकडे दुर्लक्ष केले. या डाेहात मागील सहा ते सात वर्षात ५५ पेक्षा अधिक जणांचा बुडून मृत्यू झाला आहे.