शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
4
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
5
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
6
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
7
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
8
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
9
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
10
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
11
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
12
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
13
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
14
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
15
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
16
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
17
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
18
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
19
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
20
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!

लेखन अस्सल तर प्रतिसाद नक्कीच

By admin | Updated: March 20, 2016 02:55 IST

सध्या वेगवेगळ्या कारणांसाठी आणि जाहिरातींसाठी लिहिले तर भरपूर पैसा मिळतो. पण हे लेखन टिकत नाही. ते तुम्हाला समोर नेत नाही.

विश्वास पाटील : तिसऱ्या रसिकराज संमेलनाचे उद्घाटननागपूर : सध्या वेगवेगळ्या कारणांसाठी आणि जाहिरातींसाठी लिहिले तर भरपूर पैसा मिळतो. पण हे लेखन टिकत नाही. ते तुम्हाला समोर नेत नाही. आपले साहित्य टिकावे आणि पुढच्या पिढीपर्यत जावे, असे वाटत असेल तर त्यासाठी कळा सोसाव्या लागतात. आपले अनुभवांचे संचित समृद्ध असेल तर चांगले लेखन येते. ठरवून केलेल्या लिखाणाला फारसा अर्थ नसतो. लेखन अस्सल असेल तर रसिक, वाचकांकडून चांगला प्रतिसादही मिळतो आणि त्याचे समाधानही मोठे असते, असे मत ज्येष्ठ कादंबरीकार विश्वास पाटील यांनी शनिवारी व्यक्त केले. रसिकराज सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्था आणि कमला नेहरू महाविद्यालय, सक्करदरा यांच्यातर्फे गोविंदराव वंजारी यांच्या स्मृतीला अर्पण तिसरे राज्यस्तरीय रसिकराज मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन कामगार कल्याण भवन, रघुजीनगर येथे आयोजित करण्यात आले. या संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ समीक्षक, साहित्यिक डॉ. वि. स. जोग यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून विश्वास पाटील बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाला कादंबरीकार रवींद्र शोभणे, लेखिका डॉ. प्रतिमा इंगोले, पहिल्या रसिकराज साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सुधाकर मोगलेवार, प्रमुख कार्यवाह डॉ. बळवंत भोयर, कवी ज्ञानेश वाकुडकर, मेजर हेमंत जकाते आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी पाटील म्हणाले, खासगी वाहिन्यांच्या मालिकांसाठी लेखन करणाऱ्यांना एका मालिकेच्या लेखनासाठी बक्कळ पैसा मिळतो. पण हे लिखाण टिकत नाही. यातून रसिक समृद्ध होत नाही. एखादी कादंबरी लिहिण्यासाठी पाच-पाच वर्षांचा वेळ जातो. अक्षर वाङ्मय आणि अस्सल लेखन करायचे असेल त्याच्या कळा सोसाव्या लागतात. एका दिवसात असा पराक्रम करता येत नाही. त्याची साधना असतेच. नव्या लेखकांनी अशी कळ सोसण्याची तयारी ठेवायला हवी, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या मनात मातीचा पोत आणि बीज फुलत असते तसेच लेखकाच्या मनातही कथाबीज फुलत असते. माणसांचे जगणे, प्रश्न, संघर्ष आणि वेदना लेखकही टिपत असतो. हे ज्याला टिपता येते तो चांगला लेखक होऊ शकतो. आपल्या लिखाणातील सत्त्व आणि तत्त्व जपले तर साहित्यनिर्मिती होते. मराठीत इतके प्रचंड लेखन होत असताना मराठी कधीच मरणपंथाला लागणार नाही. मराठी ही १० कोटी जनतेची भाषा आहे ती कधीही संपूच शकत नाही. आपली भाषा अत्यंत लवचिक आणि समृद्ध असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)प्रवाही भाषेसाठी लेखकांनी प्रयत्न करावेखासगी वाहिन्यांवर मराठी दाखविण्यात येणारे कार्यक्रम जगभरातील १५० ते २०० देशांत प्रसारित केले जातात. त्यामुळे जेथे मराठी माणूस तेथपर्यंत मराठी पोहोचते. पण आपली भाषा समृद्ध करण्यासाठी त्यात अधिकाधिक अनुभव आले पाहिजेत. भाषा सोपी आणि साधी करण्याचाही प्रयत्न लेखकांनी करायला हवा. सामान्य माणसांना कळेल अशी भाषा असली तर तिचा विकास होतो. मराठी हेच आपले संचित आहे, ती आपली संस्कृती आहे, ती कधीही संपू शकत नाही, असा विश्वास यावेळी विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. डॉ. जोग म्हणाले, महाराष्ट्राला मिळालेल्या प्रत्येक मुख्यमंत्र्यांना साहित्याची जाण आहे. तशी परंपराच या राज्याला लाभली आहे. साहित्यिकांची अप्रतिष्ठा होऊ नये म्हणून प्रत्येक शासनाने प्रयत्न केले आहेत. पण लेखनात कुणी जातीयवादाचे विष पेरू नये आणि ते निर्माणही करू नये. साहित्यातून एक चांगला समाज निर्माण करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी प्रतिमा इंगोले यांनी मनोगत व्यक्त करताना त्यांचा आणि नागपूरचा संबंध सांगितला. त्यांनी या संमेलनाला शुभेच्छा देतानाच आयोजक बळवंत भोयर यांचे अभिनंदन केले. प्रास्ताविकातून या संमेलनाची भूमिका डॉ. बळवंत भोयर यांनी सांगितली. संचालन शुभांगी रायलू यांनी केले. आभार भा. म. कुऱ्हाडे यांनी मानले. याप्रसंगी वर्षा किडे-कुळकर्णी यांच्या ‘वेध अंतरंगाचे आणि चेरीचे विश्व’, चित्रा कहाते यांच्या ‘स्मृतिबंध’ या कवितासंग्रहाचे मनोहर महल्ले यांच्या ‘रणरागिणी तसेच नाती आणि माती’, संजय येरणे यांच्या समीक्षा संग्रह आणि प्रतिमा इंगोले यांच्या ‘हॅट्ट्रिक’ या पुस्तकाचे अतिथींच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी संमेलनाच्या अक्षरलेणी या स्मरणिकेचेही प्रकाशन करण्यात आले.