शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

‘सेरेब्रल पाल्सी’ वाढतोय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 00:49 IST

गर्भधारणेच्या कालावधीत आईला काही इन्फेक्शन झाल्यास, रक्तदाब, मधुमेह असल्यास, श्वास घेण्यास किंवा थायरॉईड ग्रंथीचा त्रास असल्यास, वेळे आधीच प्रसूती झाल्यास, ....

ठळक मुद्देहजारात तीन रुग्ण : देशात २५ लाख नागरिक पीडित‘राष्टÑीय सेरेब्रल पाल्सी दिन’

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गर्भधारणेच्या कालावधीत आईला काही इन्फेक्शन झाल्यास, रक्तदाब, मधुमेह असल्यास, श्वास घेण्यास किंवा थायरॉईड ग्रंथीचा त्रास असल्यास, वेळे आधीच प्रसूती झाल्यास, फार कमी वजनाचे बाळ असल्यास व इतरही काही कारणांमुळे जन्माला येणारे बाळ हे ‘सेरेब्रल पाल्सी’ (गतीमंद) राहू शकते. विशेष म्हणजे, अलीकडे अयोग्य जीवनशैलीमुळे ही लक्षणे बºयाच महिलांमध्ये दिसून येऊ लागली आहे. मात्र या रुग्णांची कुठेही नोंद घेतली जात नसल्याने ‘सेरेब्रल पाल्सी’ वाढत आहे किंवा नाही हा प्रश्न आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांत उपचारासाठी येणाºया रुग्णांची संख्या वाढल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.३ आॅक्टोबर हा दिवस ‘राष्टÑीय सेरेब्रल पाल्सी दिन’ म्हणून पाळला जातो. यासंदर्भात रविवारी ‘नागपूर पेडियाट्रिक थेरेपीस्ट असोसिएशन’ने रविवारी पत्रपरिषद घेतली. यावेळी उपस्थित डॉक्टरांनी रुग्ण वाढल्याचे कबूल केले. पत्रपरिषदेत, डॉ. भाग्यश्री हजारे, डॉ. निलम शर्मा, डॉ. अल्पना मुळे, डॉ. तेजल तुराळे, डॉ. प्रेरणा वाहने, डॉ. पल्लवी भाईक, डॉ. अश्विनी हजारे, डॉ. रेणुका नाईक व डॉ. राखी यांनीही सेलेब्रर पाल्सीशी निगडित विषयांवर प्रकाश टाकला.ही एक मेंदूची स्थितीडॉ. मीनाक्षी वानखेडे या म्हणाल्या, ही एक मेंदूची स्थिती आहे. हा रोग नाही. यामध्ये शरीराचा काही भाग किंवा संपूर्ण शरीराच्या हालचालीमध्ये संतुलन किंवा सुसूत्रता नसते. सुमारे सात-आठ वर्षांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) जारी केलेल्या आकडेवारीनुसार ‘सेरेब्रल पाल्सी’चे (सीपी) हजारात तीन मुले दिसतात. भारतात २५ लाख नागरिक सेरेब्रल पाल्सीने पीडित आहे. शासनाने सेरेब्रल पाल्सीची नोंदणी सुरू केल्यास संशोधनात मदत होईल, असेही त्या म्हणाल्या.सीपीची कारणेडॉ. प्राजक्ता ठाकरे म्हणाल्या, बाळ पोटात असताना प्रसूती होईपर्यंत गर्भधारणेच्या काळात आईला काही इन्फेक्शन झाल्यास, आईला रक्तदाब, मधुमेह असल्यास, श्वास घेण्यास किंवा थायरॉईड ग्रंथीचा त्रास असल्यास, प्रसूतीच्या वेळी नाळ बाळाच्या गळ्याभोवती आवळल्यास, खूप कमी वजनाचे बाळ, लवकर न रडणारे बाळ, जन्मानंतर लगेच बाळाला होणारे इन्फेक्शन, डोक्याला मार, कावीळ आदी कारणांमुळे जन्मलेले बाळ ‘सेरेब्रल पाल्सी’ राहूूू शकते.लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्याडॉ. संपदा लाभे म्हणाल्या, बाळ जन्माला आल्यानंतर अति चिडचिड करीत असेल, फिट्स येत असतील, दूध ओढायला जमत नसेल, शरीरात अति कडकपणा किंवा अति शिथिल असेल, शरीराची एकच बाजू काम करीत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे ठरते.लवकर उपचार फायद्याचेडॉ. अभिजित देशमुख म्हणाले, सेरेब्रल पाल्सीमध्ये लवकर उपचार सुरू होणे अत्यंत फायदाचे ठरते. कारण बालवयात मेंदूची लवचिकता व शिकण्याची क्षमता फार चांगली असल्यामुळे त्याचा फायदा होतो. या उपचारपद्धतीचे मुख्य उद्दिष्ट हे बहुविकलांग मुलांना स्वावलंबी बनविणे हा असतो. सेरेब्रल पाल्सीसाठी बालरोगतज्ज्ञ, मेंदूरोगतज्ज्ञ, अस्थिरोगतज्ज्ञ, फिजिओथेरॅपिस्ट, अ‍ॅक्युपेश्नल थेरॅपिस्ट, सायकोलॉजीस्ट आदींची गरज पडते, असेही ते म्हणाले.