शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

सीईओ देणार का संघटना पदाधिकाऱ्यांना सवलत ?

By admin | Updated: May 13, 2017 02:44 IST

शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने २ जानेवारी २०१७ ला जीआर काढून राज्यातील २६० शासनमान्य संघटनांची यादी प्रकाशित केली.

जि.प. एकही संघटना शासनमान्य नाही : बदल्यावरून संघटना आमने-सामने लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने २ जानेवारी २०१७ ला जीआर काढून राज्यातील २६० शासनमान्य संघटनांची यादी प्रकाशित केली. या यादीत नागपूर जि.प.च्या एकाही संघटनेचा समावेश नाही. शनिवारी जि.प.च्या सामान्य प्रशासन विभागाच्या बदल्यांचे समुपदेशन आहे. २ जानेवारीचा शासन निर्णय जि.प.च्या काही कर्मचारी संघटनांना मान्य नाही तर काहींची भूमिका संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना सवलत मिळालीच पाहिजे अशी आहे. त्यामुळे बदल्यावरून संघटना आमने-सामने आल्या असून, सीईओंची भूमिका निर्णायक ठरणार आहे. जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांच्या चार ते पाच संघटना आहे. मात्र शासनाच्या २६० संघटनाच्या यादीत त्यांचे नाव नाही. या संघटना फार जुन्या असून त्यांनी अधिकृत नोंदणी केली आहे. शिवाय कामगार न्यायालयाच्या निर्णयानुसार नोंदणी हीच या संघटनाची मान्यता असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला आहे. त्यामुळे २ जानेवारीचा निर्णय जिल्हा परिषद संघटनाना मान्य नाही. एका कर्मचारी संघटनेनुसार महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ या नियमातील तरतुदी या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आहेत. त्या तरतुदी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना लागू होत नाही. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तणूक)नियम १९६७ मधील तरतूदी लागू होत असल्याचा दावा केला आहे. याच मुद्दावर २ मार्च २०१७ ला ग्रामविकास विकास विभागाचे सचिव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत राज्यातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या मान्यतेबाबत कायदे आणि नियमातील तरतूदी या संघटनाना लागू करण्याची तरतूद आहे का, यावर कामगार आयुक्तांकडून मार्गदर्शन मागविले होते. परंतु त्यावर अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे सामान्य प्रशासन विभागाने शासनमान्य संघटनावरुन पेच निर्माण केला आहे. मुळात शासन निर्णयामध्ये कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बदलीत सूट मिळावी अशी तरतूद आहे. याचा फायदा काही कर्मचारी घेत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे बदली प्रक्रियेत संघटनांचा हा वाद पुढे आला आहे.