लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : नागपूर-जबलपूर महामार्गावरील मनसर येथील चाैक सतत वर्दळीचा व गजबजलेला दिसून येताे. शिवाय, या ठिकाणी पर्यटक, प्रवासी व २४ तास जड वाहतूक सुरू असते. परंतु या चाैकातील उड्डाणपुलालगतच्या माेकळ्या जागेत कचरा व प्लॅस्टिक फेकला जात असल्याने येथे घाणीची समस्या तीव्र हाेऊन आराेग्याचा प्रश्न निर्माण हाेण्याची शक्यता आहे. त्यामुळे या चाैकाचे साैंदर्यीकरण करण्याची मागणी नागरिकांची आहे.
उड्डाणपुलाचे बांधकाम झाल्यानंतर येथील माेकळ्या जागेत राेपटी लावून साैंदर्यीकरण हाेईल, अशी अपेक्षा हाेती. मात्र बराच काळ हाेऊनही त्या दिशेने काेणतेही पावले उचलली गेली नाही. देवलापार व नागपूरकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाकडील माेकळ्या जागेत सर्वत्र कचरा व प्लॅस्टिक विखुरलेला असताे. यामुळे येथे घाण पसरून आराेग्याचा प्रश्न निर्माण हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. या चाैकाच्या सभाेवताल फळविक्रेते व विविध वस्तूंची दुकाने आहेत. याठिकाणी नागरिकांच्या सुविधेसाठी स्वच्छतागृह गरजेचे आहे. परंतु चाैक परिसरात स्वच्छतागृह नसल्याने नागरिक आडाेशाचा आधार घेतात. यामुळे महिलांची माेठी कुचंबणा हाेते. त्यामुळे येथे स्वच्छतागृह गरजेचे आहे.
तसेच या चाैकातील बेलगाम वाहतुकीवर कुणाचेही नियंत्रण नसते. उड्डाणपुलाखालील चारही बाजूने रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहने उभी केली जातात. अशावेळी वाहनचालक व नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागताे. त्यामुळे चाैकातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी येथे वाहतूक पाेलीस नियुक्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
...
ग्रामपंचायतीच्या वतीने जनकल्याणाची कामे नियमित सुरू आहेत. सध्या काेराेनाने पुन्हा डाेके वर काढल्याने त्यावर प्रतिबंधात्मक उपाययाेजनांची अंमलबजावणी करणे सुरू आहे. उड्डाणपूल चाैक परिसरात साैंदर्यीकरणाचेही काम हाती घेण्यात आले आहे.
- याेगेश्वरी चाेखांद्रे, सरपंच, मनसर.