नागपूर : सेंट्रल पॉइंट स्कूलतर्फे कोविड-१९ लसीकरण मोहिमेचे आयोजन मनपाच्या सहकार्याने आणि संचालक डॉ. जय सिंग राजवाडे आणि राधिका राजवाडे यांच्या विनंतीवरून करण्यात आले. ही मोहीम विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार आणि मनपाचे राम जोशी आणि सहायक आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी यांच्या सहकार्याने पार पडली. लस डॉ. विजय जोशी आणि झोनल आरोग्य अधिकारी डॉ. भावना सोनकुसळे व त्यांच्या चमूच्या देखरेखीखाली देण्यात आली. अध्यापन कर्मचारी, प्रशासक कर्मचारी आणि मदर्स पेट किंडरगार्टन व सेंटर पॉइंट स्कूलच्या सर्व शाखांचे सहायक कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबीयांना ही सुविधा शाळेच्या काटोल रोड कॅम्पसमध्ये उपलब्ध करून देण्यात आली. सावधपणे राबविण्यात आलेल्या मोहिमेत वेटिंग रूम, नोंदणी कक्ष, लसीकरण कक्ष आणि निरीक्षण कक्ष यांचा समावेश होता. कॅम्पसमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्वांची थर्मल स्कॅनिंगने तपासणी करण्यात आली. मोहिमेदरम्यान शासनाचे नियम आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले. यावेळ सर्वांची काळजी घेण्यात आली. कॅम्पसमध्ये मनपातर्फे लसीकरण मोहिमेसह आरटी-पीसीआर चाचणी घेण्यात आली. या मोहिमेत जवळपास १५० जणांनी भाग घेतला. त्यात अनेकांना लसीचा पहिला वा काहींना दुसरा डोज देण्यात आला. त्यात सेंट्रल पॉइंट स्कूलच्या कार्यकारी संचालक मुक्ता चॅटर्जी होत्या. सेंट्रल पाइंट स्कूल काटोलरोडच्या प्राचार्या शिल्पी गांगुली आणि सीपीएस केआरचे व्यवस्थापक झुबीन खंबाटा आणि त्यांच्या पथकाने व्यवस्था सांभाळली आणि मोहिमेचे आयोजन केले. या उत्तम मोहिमेसाठी कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापनाचे आभार मानले. (वा.प्र.)
सेंट्रल पॉइंट स्कूलतर्फे मनपाकडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:07 IST