शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

सेंट्रल बाजार रोड ‘आॅक्सिजन’वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 01:35 IST

शहरातील रामदासपेठ हा मेडिकल हब म्हणून ओळखला जाणारा परिसर. विदर्भच नाही तर संपूर्ण मध्य भारतातून येणारे रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि रुग्णवाहिकांची वर्दळ या भागात असते.

ठळक मुद्देरामदासपेठ ते बजाजनगर मार्गाला अतिक्रमणाचा विळखा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील रामदासपेठ हा मेडिकल हब म्हणून ओळखला जाणारा परिसर. विदर्भच नाही तर संपूर्ण मध्य भारतातून येणारे रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि रुग्णवाहिकांची वर्दळ या भागात असते. जवळचा बजाजनगर हा उच्चभ्रू वस्ती म्हणून गणला जाणारा परिसर. या महत्त्वाच्या वस्त्यांना जोडणारा सेंट्रल बाजार रोड मात्र प्रचंड अतिक्रमणामुळे आॅक्सिजनवर आहे. व्यावसायिक इमारती, रुग्णालये, हॉटेल, खानावळी यांचे संपूर्ण दुचाकी पार्किंग फूटपाथवरच होते आणि फोरव्हीलर्सचे पार्किंग रस्त्यावर येते. चहा, पोह्यांची दुकाने, फेरीवाले, दुकान आणि व्यावसायिकांचे फ्लेक्स फूटपाथवर लावले आहेत. हॉटेल मालकांनी फूटपाथ ताब्यात घेतले असून त्यांच्या फोरव्हीलर्सची पार्किंग रस्त्यावरच होते. गॅरेजवाल्यांकडे दुरुस्तीसाठी आलेल्या वाहनांची कामे रस्त्यावरच होतात आणि भंगार वाहने रस्त्यावरच पडलेली आहेत. १०० फुटापैकी अर्ध्यापेक्षा जास्त रस्ता अतिक्रमणाने गिळंकृत केला असून उरलेल्या ५० फुटात वाहतूक करावी लागत असल्याने दिवसभरात १०० वेळा तरी वाहतूक जाम होण्याचा प्रकार होतो. इमर्जन्सीमध्ये आलेल्या रुग्णवाहिकेला रुग्णालयात पोहचण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागतो. प्रचंड अव्यवस्था असलेल्या या मार्गावर सर्जिकल स्ट्राईकची गरज आहे. मात्र ही कारवाई करण्याची हिंमत करणार कोण हा प्रश्न आहे.रुग्णालयांचे पार्किंग मोठी समस्यासेंट्रल बाजार रोडवर अनेक लहान मोठी रुग्णालये आहेत. मात्र या रुग्णालयांमध्ये पार्किंगसाठी योग्य व्यवस्था नसल्याने त्यांचे पार्किंग रस्त्यावरच केले जाते. फुटपाथ तर असून नसल्यासारखा असतो. शिवाय रस्त्यावरही वाहनांचे पार्किंग होते. नियमित येणाºया रुग्णवाहिका किंवा रुग्णाला घेऊन येणारी नातेवाईकांची वाहने रोडवरच पार्क केलेली असतात. त्यामुळे वाहतुकीचा प्रचंड खोळंबा होतो.फूटपाथवर दुचाकींचे पार्किंगया रस्त्यावर फूटपाथ निर्माण केले की नाही असा प्रश्न पडावा इतके ते अतिक्रमणाने व्यापले आहेत. आकर्षण कॉम्प्लेक्स, मिडास हाईट्स, मनोमय प्लाझा, हॉटेल तुली इम्पेरियलच्या शेजारी असलेले कॉम्प्लेक्स आदी व्यावसायिक इमारतींच्या समोरचे फूटपाथ दुचाकींनी व्यापले आहेत. येथील फूटपाथ इमारतींचाच भाग असावा अशी अवस्था असून पादचाºयांसाठी कुठेही जागा शिल्लक दिसत नाही. हा प्रकार सेंट्रल बाजार रोडच्या दोन्ही बाजूला सारखाच आहे.गॅरेजवाल्यांची मनमानीकल्पना कॉम्प्लेक्स चौकाच्या समोर असलेल्या एका गॅरेजमध्ये येणाºया वाहनांची दुरुस्ती रस्त्यावरच चालते. येथे अनेक वर्षांपासून असलेली भंगार वाहने रस्त्यावरच पडली आहेत. काचीपुरा ते बजाजनगर चौकापर्यंत अनेक गॅरेज असून त्यांचेही संपूर्ण काम फूटपाथच्या समोर येत रस्त्यावरच चालते. त्यामुळे नेहमी वाहतुकीची कोंडी होते.हॉटेल, खानावळींचे अतिक्रमणया मार्गावर असलेले दोन मोठे हॉटेल वाहतुकीच्या कोंडीला कारणीभूत ठरले आहेत. हॉटेलचे पार्किं ग असूनही रोडवर थांबणाºया गाड्या वाहतुकीला अडथळा निर्माण करतात. सायंकाळच्या वेळी तर सतत ट्रॅफिक जामची समस्या वाहनचालकांना अनुभवायला मिळते. तुली इम्पेरियल हॉटेलचालकांनी फूटपाथवर झाडांच्या कुं ड्या ठेवून फूटपाथवरच कब्जा केला असून त्यावर कारवाई करण्याची कुणी हिंमत करीत नाही. या हॉटेल मालकांची दादागिरी कुणाच्या भरवशावर सुरू आहे आणि प्रशासन यांच्याविरोधात कारवाई का करीत नाही हा प्रश्न नागरिकांतर्फे उपस्थित केला जात आहे.याशिवाय लहान मोठ्या खानावळी, भोजनालये, रेस्टॉरेंटमध्ये येणाºया ग्राहकांचे पार्किंग फूटपाथ आणि रस्त्यावर होते.अस्ताव्यस्त पार्किंगया संपूर्ण मार्गावर वाहतुकीचा खोळंबा होण्याचे मोठे कारण म्हणजे होत असलेले अस्ताव्यस्त पार्किंग. पार्किंगचा कुठलाही नियम नाही. कुणी क शीही गाडी पार्क करून निघून जातो. त्यामुळे नेहमी टॅÑफिक जाम होण्याची समस्या आहे.