शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय नागरी सेवा परीक्षा २८ मे रोजी; पंधरा हजार परीक्षार्थी सहभागी होणार

By आनंद डेकाटे | Updated: May 25, 2023 18:36 IST

Nagpur News संघ लोकसेवा आयोगामार्फत आयोजित नागरी सेवा (पूर्व) परीक्षा २०२३ ही रविवार २८ मे रोजी नागपूर येथील ४० उपकेंद्रावर घेण्यात येणार आहे. परीक्षेला यंदा नागपूर केंद्रावरून एकूण १४,८८१ परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत.

आनंद डेकाटे नागपूर : संघ लोकसेवा आयोगामार्फत आयोजित नागरी सेवा (पूर्व) परीक्षा २०२३ ही रविवार २८ मे रोजी नागपूर येथील ४० उपकेंद्रावर घेण्यात येणार आहे. परीक्षेला यंदा नागपूर केंद्रावरून एकूण १४,८८१ परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत.पहिल्या सत्रात सकाळी ९.३० से ११.३० व दुसऱ्या सत्रात दुपारी २.३० ते ४.३० वाजेपर्यंत ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. परीक्षेच्या यशस्वी आयोजनाकरीता सर्व ४० उपकेंद्रावर पर्यवेक्षक, सहाय्यक पर्यवेक्षक, समवेक्षक, लिपीक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याशिवाय संघ लोकसेवा आयोगाच्या निर्देशानुसार परीक्षा सुरळीत पार होण्याकरीता प्रत्येक उपकेंद्राकरीता १ स्थानिक निरीक्षण अधिकारी असे एकूण ४० स्थानिक निरीक्षण अधिकारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.

नागरी सेवा (पूर्व) परीक्षा २०२३ करीता संघ लोकसेवा आयोगाद्वारे काही विशिष्ट बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार परीक्षार्थींना परीक्षा केंद्रावर प्रवेश हा प्रथम सत्राकरीता सकाळी ९.२० वाजेपर्यंत तर द्वितीय सत्राकरीता दुपारी २.२० वाजेपर्यंतच देण्यात येणार आहे. त्यानंतर कोणत्याही परीक्षार्थीस परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही. तसेच परीक्षार्थ्यांना आयोगाने नेमून दिलेल्या परीक्षा केंद्रावरच परीक्षा देता येणार आहे. या बदलाबाबत परीक्षार्थीनी नोंद घेऊन त्यांना नेमून दिलेल्या परीक्षा केंद्रावर व नियोजित वेळेतच उपस्थित राहतील याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सर्व परीक्षार्थींना केले आहे.

- ९.२० व २.२० नंतर प्रवेश नाहीपरीक्षार्थींना प्राप्त झालेल्या परीक्षेच्या प्रवेश पत्रावरील माहिती काळजीपूर्वक वाचून सर्व सूचनांचे पालन परीक्षार्थीने काटेकोरपणे करणे गरजेचे आहे. परीक्षार्थींना परीक्षा केंद्रावर सकाळच्या सत्राकरीता सकाळी ९.२० नंतर व दुपारच्या सत्राकरीता दुपारी २ वाजून २० मिनिटांनंतर प्रवेश देण्यात येणार नसल्याने परीक्षार्थीने याबाबत स्वतःचे स्तरावर विशेष काळजी घेऊन आयोगाने दिलेले वेळेचे बंधन कटाक्षाने पाळावयाचे असल्याचे निर्देश दिलेले आहेत.

- मोबाईल-कॅलक्युलेटर बंदीपरीक्षार्थींनी परीक्षा केंद्रावर प्रवेशपत्र, ओळखपत्र, काळा बॉल पॉईन्ट पेन तसेच आयोगाने परवानगी दिलेल्या साहित्याव्यतिरिक्त इतर कोणतेही साहित्य म्हणजे कॅलक्युलेटर, मोबाईल फोन, डिजिटल वॉच, ब्लूटुथ, आय- पॅड, आय. टी. गॅजेट किंवा इतर इलेक्ट्रॉनिक साधने परीक्षा केंद्रामध्ये आत नेण्यास सक्त मनाई आहे.

टॅग्स :examपरीक्षा