शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी कामांसाठी स्वस्त दरात सिमेंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2015 02:17 IST

लोकोपयोगी कामासाठी उभारण्यात येणाऱ्या सरकारी प्रकल्पांसाठी बाजारभावापेक्षा कमी दरात सिमेंट उपलब्ध करून

केंद्राची योजना: आॅनलाईन खरेदीची सोयनागपूर : लोकोपयोगी कामासाठी उभारण्यात येणाऱ्या सरकारी प्रकल्पांसाठी बाजारभावापेक्षा कमी दरात सिमेंट उपलब्ध करून देण्याची सोय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या रस्ते विकास मंत्रालयाने ‘इनाम’ या योजनेच्या माध्यमात उपलब्ध करून दिली आहे. ही योजना ‘आॅनलाईन’आहे.केंद्रीय रस्ते विकास व महामार्ग खात्याचे सहसचिव संजय जाजू यांनी ही माहिती दिली. मिहान आढावा बैठकीनंतर नितीन गडकरी यांनी रस्ते विकास व महामार्ग यासंदर्भात बैठक घेतली. त्यानंतर जाजू यांनी त्यांच्या खात्याच्या स्वस्त दरातील सिमेंट योजनेची माहिती दिली. ते म्हणाले की, देशभरात सरकारी यंत्रणेकडून अनेक प्रकल्पांचे बांधकाम केले जाते. यासाठी लागणाऱ्या सिमेंटची गरज मोठी असते. देशभरातील सिमेंट कंपन्या आणि त्यांचे खरेदीदार यांना एका व्यासपीठाच्या माध्यमातून एकत्र आणण्यासाठी ‘इनाम’ योजना सुरू करण्यात आली आहे. विविध सिमेंट कंपन्या या संकेतस्थळावर नोंदणी करीत आहेत.खरेदीदाराला सिमेंट हवे असेल तर त्यांनी इनामच्या संकेतस्थळाला भेट देऊन तेथे आपली मागणी नोंदवायची आहे. त्यानंतर संबंधित कंपनीकडून ग्राहकाला त्यांच्या जवळच्या प्रकल्पातून सिमेंट उपलब्ध करून दिले जाते. आतापर्यंत देशभरातील ३३ मोठ्या सिमेंट कंपन्यांच्या १०० प्रकल्पांची नोंदणी या संकेतस्थळावर झाली असून ९५ लाख मे.टन सिमेंट उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली आहे. बाजारभावापेक्षा प्रति सिमेंट बॅग ५० ते १०० रुपयाने हे दर कमी आहेत. आतापर्यंत २०० पेक्षा अधिक खरेदीदारांनी मागणी नोंदविली आहे, असे जाजू म्हणाले. स्वस्त दरातील सिमेंटमुळे प्रकल्पावरील खर्चात बचत होण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे सिमेंटच्या दरात घट होत असल्याने कंपन्यांनाही मोठे खरेदीदार या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. सध्याच्या पारंपरिक पद्धतीला मोडीत काढणारी ही योजना ‘आॅनलाईन शॉपिंग’च्या धर्तीवर आहे. यामुळे सवलतीच्या दरात शासकीय कामासाठी सिमेंट उपलब्ध होणार आहे. ग्रामपंचायतपासून महापालिका किंवा सरकारच्या अखत्यारितील बांधकाम करणारी कोणतीही यंत्रणा ही मागणी नोंदवू शकते. (प्रतिनिधी)