शहरं
Join us  
Trending Stories
1
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
2
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
3
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
4
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
5
रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
6
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!
7
VIRAL : परदेशी जोडपं फोटो काढत होतं, अचानक माकडं खांद्यावर आलं अन्... व्हिडीओ बघून खूश व्हाल!
8
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
9
निवृत्तीनंतर दरमहा मिळेल १५,००० रुपये पेन्शन, एलआयसीच्या 'या' योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
10
"एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे खर्च करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय?
11
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
12
२०२७ पर्यंत युनायटेड अमेरिकेचं विभाजन? ट्रम्प ठरणार USAचे शेवटचे राष्ट्राध्यक्ष! मोठे भाकित...
13
मराठी अभिनेत्रीचं "न्यूड" फोटोशूट; सौंदर्य पाहून चाहते प्रेमात, करत आहेत कौतुक
14
नवरात्री २०२५: १२५ वर्ष जुने कोकणातले पंचमुखी गायत्री मंदिर पाहिले का? मंत्रमुग्ध करणारी मूर्ती आणि इतिहास 
15
अश्विनची लवकरच क्रिकेटमध्ये नवी इनिंग; आता पाकिस्तानी क्रिकेटरसोबत एकाच संघात खेळणार!
16
पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
17
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
18
15 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; Volvo कार जप्त
19
Volvo EX30: एका चार्जवर ४८० किमी धावणार; वोल्वोची बहुप्रतीक्षित इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च!
20
GST कपातीचा फायदा मिळत नाहीये? टोल-फ्री नंबर किंवा व्हॉट्सअॅपवर करू शकता थेट तक्रार

एक सोहळा कृतज्ञतेचा...

By admin | Updated: July 21, 2015 03:51 IST

महापालिकेची स्थापना झाल्यानंतर पहिली सभा २० जुलै १९५२ रोजी महाल येथील टाऊ न हॉल येथे झाली होती. याला ६२

नागपूर : महापालिकेची स्थापना झाल्यानंतर पहिली सभा २० जुलै १९५२ रोजी महाल येथील टाऊ न हॉल येथे झाली होती. याला ६२ वर्षे पूर्ण झाली. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व पहिल्या सभागृहाचे सदस्य व माजी उपमहापौर सदानंद फुलझेले, पहिले महापौर बॅरि. शेषराव वानखेडे यांच्या कन्या व माजी महापौर कुंदाताई विजयकर यांच्यासह या सभागृहातील सदस्यांचे नातेवाईक, माजी महापौर, उपमहापौर व स्थायी समिती अध्यक्ष व त्यांच्या कुटुंबीयांचा आज सोमवारी सर्वसाधारण सभेत सत्कार करण्यात आला. महापौर प्रवीण दटके यांनी सर्वप्रथम सदानंद फुलझेले यांचा मानपत्र, शाल व श्र्रीफळ देऊ न सत्कार केला. त्यानंतर कुंदाताई विजयकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच माजी महापौर हरिभाऊ नाईक, कृष्णराव पांडव, पांडुरंग हिवरकर, किशोर डोरले, कल्पना पांडे, वसुंधरा मासूरकर, पुष्पा घोडे, विकास ठाकरे, मायाताई इवनाते, अर्चना डेहनकर व देवराव उमरेडकर आदींचा सत्कार करण्यात आला.माजी उपमहापौर नरेश पटेल, कृ ष्णराव परतेकी, सुनील अग्रवाल, हरीश राऊत, धीरेंद्र चहांदे, अशोक जर्मन, अब्दुल मजीद शोला, राजेंद्र लोखंडे, रवींद्र भोयर, अण्णाजी राऊ त, किशोर कुमेरिया, संदीप जाधव व जैतुनबी अन्सारी आदींचा सत्कार करण्यात आला. तसेच स्थायी समितीच्या माजी अध्यक्षात उमेश चौबे, हरिभाऊ केदार, तानाजी वनवे, कृ ष्णराव कावळे, आभा चतुर्वेदी, नाना मोहोड, मोहन मते आदींचाही सत्कार करण्यात आला. पहिल्या सभागृहाचे सदस्य सदाशिव दांडिगे यांचा मुलगा रंजन दांडिगे, विठ्ठल नगरारे यांचा मुलगा शैलेंद्र नगरारे, चिमासाहेब भोसले यांची सून विजयमाला भोसले, हाजी अब्दुल मजीज लीडर यांचे नातू मोहम्मद फजल मोहम्मद अफजल, बाबूराव टक्कामोेरे यांचे पुतणे अजय टक्कामोरे, डॉ. रामजीवन चौधरी यांचा मुलगा संजीव चौधरी, सदानंद फुलझेले यांची नात नेहा किमगावकर, बनवारीलाल अग्रवाल यांचा मुलगा शिव अग्रवाल, केशव वानखेडे यांचे नातू उदय इंगोले, रामकृ ष्ण समर्थ यांची सून आशा समर्थ, नथ्थूजी बेलेकर यांचा मुलगा मोरेश्वर बेलेकर, गया नारायण त्रिवेदी यांचा मुलगा राजकुमार त्रिवेदी, गयाप्रसाद तिवारी यांचा मुलगा सतीश तिवारी, नागोराव हजारे यांची सून शांताबाई हजारे, महादेव पाठराबे यांचा मुलगा तारेश्वर पाठराबे, जिवाजी मोटघरे यांचा मुलगा रामभाऊ मोटघरे, दीनानाथ धापोडकर यांचा मुलगा मोहन धापोडकर, गोविंदराव भांबूरकर यांचा नातू विक्रांत भांबूरकर, डॉ. देवीदास दुरुगकर यांचा मुलगा रवींद्र दुरुगकर, दौलतजी पटेल यांचा मुलगा भैयालाल पटेल, छोटेलाल सूचक यांचा नातू संजय सूचक, अमरसिंग ढिल्लन यांची सून मनजित कौर, शंकर नंदनकर यांची सून रत्नाबाई नंदनकर व अमरसिंग लालसिंग यांच्या सुनेचा सत्कारमूर्तीत समावेश होता.त्यावेळी महापालिकेचे ४२ वॉर्ड होते, परंतु ५७ सदस्य होते. यात १५ नामनिर्देशित सदस्यांचा समावेश होता. बॅरि. शेषराव वानखेडे निवडून आले नव्हते. ते नामनिर्देशित सदस्य होते. परंतु त्यावेळी नामनिर्देशित सदस्यांची पदाधिकारी म्हणून निवड केली जात होती. १९५६ साली सदानंद फुलझेले उपमहापौर झाले. रणजित दांडगे हे पहिल्या स्थायी समितीचे अध्यक्ष होते. छोटेलाल सूचक हे पहिले उपमहापौर होते, अशी माहिती सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी यांनी प्रास्ताविकातून दिली.(प्रतिनिधी)देसराज सलग पाचवेळा महापौरमहापालिकेत नगरसेवक म्हणून पाचवेळा निवडून येण्याचा मान आठ सदस्यांना मिळाला. यातील पन्नालाल देसराज हे सलग पाचवेळा शहराचे महापौर होते. दीनानाथ आकोडकर, महादेवराव भोयर, नाना श्यामकुळे, हिंमतराव सरायकर, अनिल सोले, सुनील अग्रवाल व राजू लोखंडे आदींचा यात समावेश आहे. दौलत पटेल कुटुंबातील तीन पिढ्यातील सदस्यांना सभागृहात येण्याचा मान मिळाला. यात दौलत पटेल, मोहन पटेल व विद्यमान सदस्य दीपक पटेल यांचा समावेश आहे.सत्काराचा आनंद पहिल्या सभागृहात एक मताने निवडून आलो. १९५६ साली उपमहापौर होण्याची संधी आली. यानिमित्ताने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मदीक्षा सोहळ्याची जबाबदारी आली. आजही ही जबाबदारी सांभाळत आहे. पहिली निवडणूक माझ्या जीवनातील टर्निंग पॉर्इंट ठरली. मनपाने समारंभ आयोजित करून जुन्या सदस्यांचा सत्कार केला याचा आनंद होत असल्याचे प्रतिपादन सदानंद फुलझेले यांनी आपल्या भाषणातून केले.पहिल्या महिला महापौर बॅरि. शेषराव वानखेडे यांना प्रथम महापौर होण्याचा मान मिळाला तर त्यांची मुलगी कुंदाताई विजयकर यांना पहिल्या महिला महापौर होण्याचा मान मिळाला. योगायोगाने २० जुलै हा त्यांचा वाढदिवसही आहे. या निमित्ताने सदानंद फुलझेले यांची नात नेहा किमगावकर यांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.१९५१ साली झाली महापालिका२ मार्च १९५१ साली नागपूर नगर परिषदेला महापालिकेचा दर्जा मिळाला. त्यावेळी गोपाळ पाठक नगराध्यक्ष होते. शासनाने महापालिका गठित करून डी.जी. देसाई यांची प्रशासक म्हणून नेमणूक केली होती. त्यानंतर १९५२ साली महापालिकेची पहिली निवडणूक झाली. १९६४ साली मनपा बरखास्त झाली १९६४ साली शासनाने नळाला मीटर लावण्याचा आदेश काढला होता. परंतु पाण्याचे पैसे आकारणार नाही, अशी भूमिका तत्कालीन महापौर बाबुलाल टक्कामोरे यांनी घेतली. शासनाचा आदेश न मानता पदाचा राजीनामा देणे पसंत केले. त्यामुळे मनपा बरखास्त करण्यात आली होती. अशी माहिती टक्कामोेरे यांचे पुतणे अजय टक्कामोरे यांनी दिली.