शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

फसव्या ऑफरपासून लांब रहा; सायबर सुरक्षेसह साजरा करा व्हॅलेन्टाईन डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 12:49 IST

Nagpur News सध्या सर्वत्र कोरोना संक्रमन पसरले असल्यामुळे या वस्तू खरेदी करण्यासाठी बहुतेक जन ऑनलाईन व्यवहार करीत आहेत. सायबर सेक्युरिट वेबसाईट चेक पॉईन्टनुसार सायबर गुन्हेगार याचा फायदा घेण्यासाठी सक्रिय झाले आहेत.

अंकिता देशकर

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणून जगभर व्हॅलेन्टाईन डे साजरा केला जातो. या दिवशी आवडत्या व्यक्तीला भेटवस्तू व चॉकलेट दिले जाते. सध्या सर्वत्र कोरोना संक्रमन पसरले असल्यामुळे या वस्तू खरेदी करण्यासाठी बहुतेक जन ऑनलाईन व्यवहार करीत आहेत. सायबर सेक्युरिट वेबसाईट चेक पॉईन्टनुसार सायबर गुन्हेगार याचा फायदा घेण्यासाठी सक्रिय झाले आहेत. व्हॅलेन्टाईन शब्द वापरून तयार केलेल्या वेबसाईटद्वारे नागरिकांना जाळ्यात फसवले जात आहे.

सायबर गुन्हेगार वेबसाईटच्या नावात व्हॅलेन्टाईन शब्द वापरून दोन उद्देश साध्य करतात. व्हॅलेन्टाईन डेमध्ये रस असणारे इंटरनेट युजर्स या वेबसाईटकडे आकर्षित होतात, तसेच व्हॅलेन्टाईनवरील इतर अनेक अधिकृत वेबसाईटमुळे बनावट वेबसाईट लक्षात येत नाही. बनावट वेबसाईटद्वारे विविध आकर्षक ऑफर्स जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यात ताज हॉटेलने गिफ्ट कार्ड ऑफर केल्याचे म्हटले गेले आहे. ताज हॉटेलने या ऑफरचा इन्कार केला आहे; परंतु अनेक जण अशा फसव्या ऑफरला बळी पडतात. गृह मंत्रालयाच्या सायबर दोस्त उपक्रमातून नागरिकांना सावध राहण्याची सूचना करण्यात आली आहे. नागपूर शहर सायबर सेलनेही फसव्या ऑफरपासून लांब राहण्याचे आवाहन केले आहे.

सुरक्षा टिप्स

१ - फसव्या लिंकवर क्लिक करू नका.

२ - प्रमाणित वेबसाईटवरूनच खरेदी करा

३ - लॉगिनची माहिती कुणालाही सांगू नका

४ - विशेष ऑफर्सपासून सावध रहा

५ - समान डोमेन नेमपासून सावध रहा

६ - वैयक्तिक माहिती जाहीर करू नका.

सायबर गुन्हेगारांपासून सावध रहा

नागपूरमध्ये व्हॅलेन्टाईन डेशी संबंधित सायबर गुन्हे घडले नाही, तरीपण नागरिकांनी अशा गुन्ह्यापासून सावध रहावे. संशयास्पद लिंक उघडून पाहू नये. व्हॅलेन्टाईन डेशी संबंधित छायाचित्रे सोशल मीडियावर अपलोड करू नये. सायबर गुन्हेगार त्याचा दुरुपयोग करू शकतात.

---- डॉ. अशोक बागुल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर सेल.

टॅग्स :Valentine Dayव्हॅलेंटाईन्स डे