मनपाने जाहीर केली नियमावली
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य सरकारकडून ख्रिसमससाठी गाईडलाईन जारी केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नागपूर शहरासाठी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी आदेश जारी करून नव्या नियमांनुसार यंदाचा ख्रिसमस साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन केले आहे.
...
अशा आहेत गाईडलाईन
नागरिकांनी कोरोनापासून बचावासाठी योग्य ती काळजी घ्यावी. चर्चमध्ये ख्रिसमसदरम्यान गर्दी न होण्याची काळजी घ्यावी.
सामूहिक प्रार्थनेत ५० हून अधिक व्यक्तींचा समावेश नसावा. फिजिकल डिन्स्टन्सिंगचे पालन करावे. प्रत्येकाने मास्क घालणे आवश्यक आहे. चर्च तसेच परिसराचे सॅनिटायझेशन करावे.
ज्येष्ठ नागरिक ज्यांचे वय ६० हून अधिक आहे तसेच १० वर्षाहून कमी वयाची लहान मुले अशांनी चर्चमध्ये जाणे टाळावे. तसेच रात्री उशिरापर्यंत कार्यक्रम घेऊ नये.