शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

‘इग्नू’चा वर्धापनदिन उत्साहात

By admin | Updated: September 13, 2015 03:03 IST

‘इग्नू’च्या(इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी) विभागीय केंद्राचा सहावा वर्धापनदिन सोहळा गुरुवारी संपन्न झाला.

नागपूर : ‘इग्नू’च्या(इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी) विभागीय केंद्राचा सहावा वर्धापनदिन सोहळा गुरुवारी संपन्न झाला. तळागाळातील लोकांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचविणाऱ्या ‘इग्नू’मुळे नागरिकांना स्वत:च्या पायावर उभे राहता येतेच शिवाय त्यांच्यातील आत्मविश्वासदेखील वाढीस लागला आहे. समाजातील सर्व घटकांपर्यंत ज्ञानरूपी सागर पोहोचविणाऱ्या ‘इग्नू’ची भूमिका द्रोणाचार्यांसारखीच असल्याची भावना यावेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.‘इग्नू’च्या प्रादेशिक कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी ‘ज्ञान गंगा-सर्वधर्मासाठी शिक्षण’ अशी संकल्पना ठेवण्यात आली होती. यावेळी ‘इग्नू’च्या विभागीय केंद्राचे संचालक डॉ.पी.शिवस्वरुप हे उपस्थित होते. या कार्यक्रमाला ‘इग्नू’च्या विद्यार्थ्यांनाच प्रमुख अतिथी म्हणून बोलविण्यात आले होते. डॉ. शिवस्वरुप यांनी सुरुवातीला केंद्राच्या वर्षभरातील कामगिरीचा अहवाल सादर केला. फक्त सहा वर्षांआधी उभारणी करण्यात आलेल्या इग्नू संस्थानाने मोठी भरारी मारली आहे. इग्नूचे नागपूर केंद्र सुरू झाल्यापासून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यामध्ये नागपूर मध्यवर्ती कारागृहातील बंदिवानांसाठी शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू करण्याचे कार्य करण्यात आले. आतापर्यंत ५९९ कैद्यांना याचा लाभ झाला आहे. सोबतच कुरखेडा-गडचिरोलीसारख्या दुर्गम आदिवासी भागामध्ये ६४७ जण ‘इग्नू’चे विद्यार्थी झाले. गडचिरोलीतील महिलांना शिक्षणाच्या आधारे स्वावलंबी करणे, वारांगनांसाठी शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणे असे अनेक कार्य संस्थेच्यावतीने होत आहेत. जनतेशी जुळून काम करणे हेच आमचे ध्येय असल्याचे मतही डॉ. पी. शिवस्वरूप यांनी व्यक्त केले. यावेळी शिक्षणासाठी ‘इग्नू’सोबत जुळलेल्या सकीना बनवानीवाला, अमृता शिरपूरकर, सिस्टर सिल्वी, दिलनार नोशिल रंदेलिया, जमशेदसिंह कपूर, ज्ञानविकास चकमा, फादर विल्सन अब्राहम, प्रा.एस.पी.संगल यांनी भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे संचालन डॉ. शक्ती शर्मा यांनी केले तर डॉ.रश्मी बत्रा यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)