शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

ओसीडब्ल्यूच्या कराराची सीबीआय चौकशी करा

By admin | Updated: October 8, 2015 03:10 IST

शहरातील पाणीपुरवठ्याची जबाबदारी असलेल्या आॅरेंज सिटी वॉटर वर्क्स (ओसीडब्ल्यू) कंपनीने जुने पाणीमीटर बदलवून नवीन लावण्याची मोहीम हाती घेतली आहे.

राष्ट्रवादीची मागणी : महापालिका आयुक्तांना निवेदननागपूर : शहरातील पाणीपुरवठ्याची जबाबदारी असलेल्या आॅरेंज सिटी वॉटर वर्क्स (ओसीडब्ल्यू) कंपनीने जुने पाणीमीटर बदलवून नवीन लावण्याची मोहीम हाती घेतली आहे. परंतु बाजारातील किमतीच्या तुलनेत मीटरची दुप्पट किंमत वसूल करून शहरातील लोकांची फसवणूक करीत आहेत. त्यामुळे महापालिका व ओसीडब्ल्यू यांच्यात झालेल्या कराराची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे महापालिकेतील माजी गटनेते वेदप्रकाश आर्य यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने बुधवारी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याशी यासंदर्भात निवेदन सादर करून चर्चा केली. शहर कार्याध्यक्ष प्रवीण कुंटे, माजी आमदार दीनानाथ पडोळे, अनिल अहिरकर, गटनेते राजू नागुलवार, विशाल खांडेकर, अशोक काटले, राजेन्द्र बढीये, अशोक राऊ त, मोरेश्वर जाधव, राधेश्याम वर्मा, संजय शेवाळे आदींचा शिष्टमंडळात समावेश होता. महापालिका व ओसीडब्ल्यू यांच्यात झालेल्या करारानुसार ओसीडब्ल्यू शहरातील ग्राहकांचे पाणीमीटर बदलवित आहे. हनुमाननगर झोनमधील मीटर बदलविण्याचे काम सुरू आहे. बाजारात ८८७ रुपये किंमत असलेल्या मीटरची १४९२ रुपयाप्रमाणे शुल्क आकारणी केली जात आहे. नळ जोडणीचा प्रत्येकी खर्च १४९४ रुपये येत असताना ३४८४ रुपये वसूल करीत आहेत. लेखा परीक्षकांनीही यावर आक्षेप नोंदविला असल्याचे आर्य यांनी निदर्शनास आणले. महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असताना ओसीडब्ल्यूकडून निधीचा दुरुपयोग केला जात आहे. आधीच या कंपनीला २६ कोटीचा निधी अतिरिक्त देण्यात आल्याचा आक्षेप आहे. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन हर्डीकर यांनी दिले आहे. आयुक्तांंनी १५ दिवसात चौकशी न केल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करू. त्यानंतरही शहरातील नागरिकांना न्याय न मिळाल्यास न्यायालयात जाण्याच्या इशारा वेदप्रकाश आर्य यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)