शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सीबीडीटी व सीबीआयसी विभागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:08 IST

- माहितीच्या अधिकारात बाब उघड : पदभरतीसाठी आरटीआय कार्यकर्त्याचे पंतप्रधानांना पत्र नागपूर : देशाच्या वित्त मंत्रालयांतर्गत कार्यरत केंद्रीय अप्रत्यक्ष ...

- माहितीच्या अधिकारात बाब उघड : पदभरतीसाठी आरटीआय कार्यकर्त्याचे पंतप्रधानांना पत्र

नागपूर : देशाच्या वित्त मंत्रालयांतर्गत कार्यरत केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळ (सीबीआयसी) आणि केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळांतर्गत (सीबीडीटी) सर्व विभागात ७० हजारांपेक्षा जास्त पदे रिक्त असून सरकारने अनेक वर्षांपासून भरती केलेली नाही. त्यामुळे कार्यालयातील कामाला उशीर होत असल्याचे दिसून येत आहे.

ही बाब माहितीच्या अधिकारांतर्गत उघड झाली आहे. आरटीआय कार्यकर्ते संजय थूल यांनी दोन्ही विभागाकडे मागितलेल्या माहितीच्या अधिकारात उपरोक्त माहिती मिळाली आहे. यामध्ये सीबीआयसीमध्ये ४० हजारांपेक्षा जास्त आणि सीबीडीटीमध्ये ३० हजारांपेक्षा जास्त पदे रिक्त असल्याचे उत्तर थूल यांना माहितीच्या अधिकारात विचारलेल्या प्रश्नांना मिळाली आहेत. या विभागाच्या संकेतस्थळावर पदे रिक्त असल्याची माहिती प्रकाशित केली आहे.

केंद्रीय जीएसटी नागपूर विभागात सहायक आयुक्त पदावर कार्यरत आणि ऑल इंडिया फेडरेशन फॉर कस्टम, सेंट्रल एक्साईज अ‍ॅन्ड जीएसटी एससी/एसटी एम्प्लाईज वेलफेअर ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले संजय थूल यांनी रिक्त पदे भरण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. थूल म्हणाले, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे कार्यरत अधिकाऱ्यांवर कामाचा ताण येत असून त्यांची कार्यक्षमता कमी होत आहे. कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार हिरावला आहे. कोरोनामुळे देशात बेरोजगारांची संख्या वाढली आहे. अशातच रिक्त पदे भरण्याची गरज आहे. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे जीएसटी संकलनावर परिणाम होत आहे.

थूल म्हणाले, काही रेंजमध्ये एक अधीक्षक आणि निरीक्षकावर काम सुरू आहे तर करदात्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. अपुरे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमुळे करदात्यांना वेळेत सेवा देण्यात अडचणी येत आहेत. महत्त्वाची कामे म्हणजे रिपोर्ट, करदात्यांसोबत पत्रव्यवहार, डिमांड नोटीस काढणे, आक्षेप निकाली काढण्यास उशीर होत आहे. या परिस्थितीचा काही असामाजिक तत्त्वे फायदा घेत असल्याने जीएसटी संकलनात घट होत आहे, असे थूल यांनी सांगितले.

सीबीआयसी अंतर्गत कर्मचारी व अधिकारी पदांची स्थिती

वर्गमंजूर पदे कार्यरत रिक्त पदे

अ६,३८१३,७००२,६८१

ब २२,२१७१७,३०६४,९११

(राजपत्रित)

ब ३२,३६२१७,०२६१५,३३६

(अराजपत्रित)

क३०,७४०१३,०५९१७,६८१

एकूण ९१,७००५१,०९१४०,६०९

सीबीडीटी अंतर्गत कर्मचारी व अधिकारी पदांची स्थिती

अ४,९२१४,०२८ ८९३

ब८,३७३७,४९३ ८८०

क६३,०२७३३,९८३२९,०४४

एकूण ७६,३२१४५,५०४३०,८१७