शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

गुरांच्या अवैध वाहतुकीचे वाहन पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:07 IST

भिवापूर : पाेेलिसांच्या पथकाने उमरेड-भिसी (जिल्हा चंद्रपूर) मार्गावरील सालेभट्टी शिवारात केलेल्या कारवाईमध्ये गुरांची अवैध वाहतूक करणारे छाेटे मालवाहू वाहन ...

भिवापूर : पाेेलिसांच्या पथकाने उमरेड-भिसी (जिल्हा चंद्रपूर) मार्गावरील सालेभट्टी शिवारात केलेल्या कारवाईमध्ये गुरांची अवैध वाहतूक करणारे छाेटे मालवाहू वाहन पकडले. यात दाेघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून एकूण ४ लाख ४४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई बुधवारी (दि. १६) रात्री ७ वाजताच्या सुमारास करण्यात आली.

अजय धनराज चाैधरी (२८, रा. नागतराेली, ता. भिवापूर) व कुंदन ऊर्फ गब्बर गाेयल (२०, रा. निष्ठी, ता. पवनी, जिल्हा भंडारा) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. भिवापूर पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना सालेभट्टी शिवारातून एमएच-४०/बीएल-०७२२ क्रमांकाचे छाेटे मालवाहू वाहन जाताना दिसले. संशय आल्याने त्यांनी हे वाहन थांबवून झडती घेतली. त्यात त्यांना ११ गाई काेंबल्या असल्याचे आढळून आले.

कागदपत्रांच्या तपासणीअंती ती गुरांची अवैध वाहतूक असल्याचे स्पष्ट हाेताच पाेलिसांनी वाहनातील दाेघांना अटक करीत ११ गाईंची सुटका केली व त्या गाईंना नजीकच्या गाेरक्षणमध्ये पाठविण्याची व्यवस्था केली. या कारवाईमध्ये चार लाख रुपयाचे वाहन व ४४ हजार रुपयांची जनावरे असा एकूण ४ लाख ४४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती ठाणेदार महेश भाेरटेकर यांनी दिली. याप्रकरणी भिवापूर पाेलिसांनी गुन्हा नाेंदविला असून, ही कारवाई पाेलीस उपनिरीक्षक प्रकाश चंगाेले, उमेश झिंगरे, संदेश रामटेके, रवींद्र लेंडे यांच्या पथकाने केली.