शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

गुरांच्या अवैध वाहतुकीचे वाहन पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:08 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क नरखेड : पाेलिसांच्या पथकाने खंडाळा (बु.) शिवारात केलेल्या कारवाईमध्ये गुरांची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला. त्यात ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

नरखेड : पाेलिसांच्या पथकाने खंडाळा (बु.) शिवारात केलेल्या कारवाईमध्ये गुरांची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला. त्यात ट्रकचालकास अटक करण्यात आली असून, ३५ गुरांची सुटका करीत १३ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शुक्रवारी (दि. ३०) सकाळी १० वाजेच्या सुमारास करण्यात आली.

काेमल गाेंडू साेेलंखी (४२, रा. शेंडेनगर, टेकानाका, नागपूर), असे अटक करण्यात आलेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. नरखेड पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना सावरगाव (ता. नरखेड) परिसरातून गुरांची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी सावरगाव परिसरात एमएच-२९/टी-१४४७ क्रमांकाच्या ट्रकच्या चालकास थांबण्याचा इशारा केला. मात्र, या ट्रकचालकाने तेथून पळ काढला. त्यामुळे पाेलिसांनी हा ट्रक पाठलाग करून खंडाळा (बु.) शिवारात अडविला.

झडतीदरम्यान त्या ट्रकमध्ये ३५ जनावरे काेबली असल्याचे आढळून आले. ती गुरांची अवैध वाहतूक असल्याचे, तसेच ती सर्व जनावरे कत्तलखान्यात नेली जात असल्याचे चाैकशीत स्पष्ट हाेताच पाेलिसांनी ट्रकचालकास अटक केली. शिवाय, ट्रकमधील सर्व गुरांची सुटका करीत पाेलिसांनी त्यांना नजीकच्या गाेरक्षणमध्ये पाठविण्याची व्यवस्था केली. या कारवाईमध्ये १० लाख रुपये किमतीचा ट्रक आणि ३ लाख ८५ हजार रुपये किमतीची ३५ जनावरे, असा एकूण १३ लाख ८५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती ठाणेदार जयपालसिंग गिरासे यांनी दिली. याप्रकरणी नरखेड पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई सहायक फाैजदार राजू गजभये यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.