शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

चोरीचा ट्रक पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:08 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क वाडी : परराज्यातून चाेरून आणलेल्या ट्रकची नंबर प्लेट बदलवून नागपूरच्या दिशेने जात असलेल्या चाेरट्याला वाडी पाेलिसांनी ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

वाडी : परराज्यातून चाेरून आणलेल्या ट्रकची नंबर प्लेट बदलवून नागपूरच्या दिशेने जात असलेल्या चाेरट्याला वाडी पाेलिसांनी अटक केली. शिवाय, त्याच्याकडून ट्रक जप्त केला. बुधवारी (दि. १७) सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावर ही कारवाई करण्यात आली.

नंदू सुपचंद खाकरे (३६, रा. बाजारचौक, आठनेर, ता. मुलताई, जिल्हा बैतुल, मध्य प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. सीजी-०४/वाय-०४३५ क्रमांकाचा ट्रक चाेरीचा असून, त्याची नंबर प्लेट बदलवण्यात आली, तसेच ताे ट्रक गाेंडखैरी (ता. कळमेश्वर)हून नागपूरच्या दिशेने जात असल्याची माहिती वाडी पाेलिसांना मिळाली हाेती. त्यामुळे पाेलिसांनी या ट्रकचा शाेध घेतला.

त्यांना हा ट्रक नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गालगतच्या धाब्याजवळ आढळून येताच त्यांनी नंदूला ताब्यात घेत चाैकशी केली. शिवाय, ट्रकची कागदपत्रे मागितली. सुरुवातीला असंंबद्ध उत्तरे दिल्यानंतर त्याने ट्रक चाेरून आणल्याचे मान्य केले. हा ट्रक बलाेदा (बाजार), छत्तीसगड येथून चाेरून आणल्याचे तसेच त्या ट्रकचा मूळ क्रमांक सीजी-०४/९३३४ असल्याचे त्याने पाेलिसांना सांगितले. परिणामी, पाेलिसांनी त्याला अटक करून ट्रक जप्त केला. याप्रकरणी वाडी पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला. ही कारवाई ठाणेदार प्रदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात पाेलीस उपनिरीक्षक साजेद अहमद, हवालदार सुनील मस्के यांच्या पथकाने केली.